ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली गेली. कपूर कुटुंबातील हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचा चार्म आणि त्यांच्या नुसत्या हसण्यानेच कित्येक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. किंबहुना एक वेळ तर अशीही होती की, त्यांच्या चार्मसमोर रुपवान अभिनेत्रींचे सौंदर्यही फिके पडले होते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्रिकूटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. पण, एक देखणा अभिनेता म्हणून तरुणींकडून शशी कपूर यांना विशेष पसंती मिळाली.
प्रेयसीवर प्रेम करण्याची त्यांची अनोखी पद्धत, नुसत्या हसण्याने तिचा राग कुठतच्या कुठे पळवण्याची त्यांची अदा आणि मोठ्या उत्साहात एखाद्या गाण्यावर थिरकण्याचा त्यांचा अंदाज आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत शशी कपूर यांच्या वाट्याला बरीच प्रसिद्ध गाणी आली. ‘ओ मेरी शर्मिली’पासून ते अगदी ‘खिलते है गुल यहाँ’ पर्यंतच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहणयाची संधी प्रेक्षकांना मिळाली. ‘अफ़्फ़ू खुदायाssss’, अशी आरोळी ठोकत उत्साहात उडी मारणाऱ्या शशी कपूर यांना कोणाही विसरु शकलेलं नाही.
वाचा : BLOG : अभिनयातला ‘चंद्र’ हरपला
‘वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ’, या गाण्यात शर्मिला टागोरसोबत फ्लर्ट करणाऱ्या शशीजींच्या अदा, ‘एक था गुल एक थी बुलबुल’ या गाण्यातून अनेकांच्या काळजाला भिडल्या. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील चमक आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणाऱ्या या अभिनेत्याची ही वैशिष्ट्ये चित्रपटसृष्टीत त्यांना वेगळं स्थान देऊन गेली. अशा या अभिनेत्याची काही गाजलेली गाणी खालीलप्रमाणे…
खिलते है गुल यहाँ-
एक था गुल एक थी बुलबुल-
हमको तुमपे प्यार आया-
कह दूँ तुम्हे-
तेरा मुझसे है पहले का नाता कोई-
ओ मेरी शर्मीली-
वादा करो-
कभी कभी मेरे दिल में-