बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या एका मोठ्या पेचात सापडला आहे. एका चाहतीमुळे त्याच्यावर पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. त्या चाहतीने वरुणला थेट आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून वरुणला व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एक चाहती सतत मेसेज करत होती. त्यानंतर तिच्या मेसेजला कंटाळून वरुणने तो नंबर ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. निदान नंबर ब्लॉक केल्याचे कळताच ती मेसेज करणे बंद करेल असेच त्याला वाटत होते. पण, तसे काहीच झाले नाही. कारण, काही दिवसांनी लगेचच वरुणला एका अनोळखी नंबरवरुन फोन येऊ लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जी व्यक्ती वरुणला वारंवार मेसेज करुन त्रास देत होती त्याच व्यक्तीने त्याला दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्य म्हणजे त्या चाहतीने सर्वच मर्यादा ओलांडल्यामुळे आणि आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे वरुणने कोणताही चुकीचा प्रकार होण्यापूर्वी जुहू पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याचे घर सांताक्रूझ पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याला तेथे तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला. वरुणच्या तक्रारीनंतर आता याप्रकरणी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या नंबरवरुन वरुणला फोन आला होता तो नंतर आता बंद येत आहे. त्यामुळे पोलिसांपुढे आता एक नवा पेच उभा राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

सेलिब्रिटींसाठी त्यांचे चाहते सर्वकाही असतात. काही सेलिब्रिटी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. पण, काही चाहते मात्र सर्व मर्यादा ओलांडतात ज्यामुळे कलाकारांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो.