एकाच चेहऱ्याच्या जवळपास सात व्यक्ती जगात असतात, असे म्हटले जाते. ही बाब आता कितपत खरी किंवा खोटी हे ठाऊक नाही. पण, अनेकदा या गोष्टीवर खरंच विश्वास ठेवण्याइतपत परिस्थिती निर्माण होते. अभिनेत्री प्रियांका चोप्राप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या नवप्रीत बांगाच्या वेळी तर या विधानावर बऱ्याचजणांचा विश्वास बसला. फक्त प्रियांकाच नव्हे तर दीपिका पदुकोणच्या बाबतीतही हे ‘हुबेहुब’ प्रकरण घडले होते. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचा चेहरा दीपिकाप्रमाणेच असून अनेकांनी तिच्या आणि बी- टाऊनच्या ‘मस्तानी’च्या लूकमध्ये तुलना करण्यासही सुरुवात केली होती. त्या अभिनेत्रीचे नाव आहे अमला पॉल.

अमला सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. पण, ती आणखी एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली होती. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सिंधू समवेली’ या चित्रपटात झळकल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या चित्रपटातून एक मुलगी आणि तिच्या सासऱ्यांमध्ये असलेल्या अनैतिक संबंधांवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात भूमिका साकारल्यामुळेच अमलाला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येऊ लागले होते. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला होता. अमलाने त्या प्रसंगाचा मोठ्या धैर्याने सामना करत आपल्या करिअरवरच लक्ष केंद्रित केले.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या काही अभिनेत्रींच्या यादीत तिच्या नावाचा समावेश होतो. अमला हुबेहुब दीपिका पदुकोणप्रमाणे दिसते असा अनेकांचाच समज आहे. काही बाबतीत ते पटतेही, कारण या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो एकमेकांच्या बाजूला ठेवले तर त्यात फारसा फरक दिसत नाही. दीपिकासोबत आपली तुलना होणे अमलासाठीही नवे होते. पण, ही बाब आपल्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे तिने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.