अनेकदा करिना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी आहे. मात्र, सध्या करिना आणि तैमुर या माय लेकांच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाच महिन्यांचा तैमुर आई करिना कपूरसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागलाय. अभिनेता तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये करिना तैमुरसोबत पाहायला मिळाली. यावेळी तैमूरचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्याप्रमाणे करिना कपूर आपल्या चेहऱ्यावरील अत्यंत आकर्षक अशा हावभावांसाठी प्रसिद्ध आहे तसेच हावभाव तैमुरच्या गोंडस चेहऱ्यावर टिपले गेले.

सैफ अली खानने स्वत:च्या व्हॉट्स अॅपवर तैमुरचा डीपी ठेवल्यानंतर सोशल मीडियावर छोट्या नवाबचा फोटो व्हायरल झाला होता. त्यातही तैमुरच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वांनाच आकर्षित करणारे होते. सोशल मीडियावर चाहते करिनाच्या बालपणातील फोटोंसोबत तैमुरच्या फोटोची तुलना करू लागले आहेत. हे फोटो पाहून आपल्याला म्हणावेच लागेल की तैमुरला चेहऱ्यावरील आकर्षक हावभावांची देणगी आई करिनाकडूनच मिळाली आहे. करिनाप्रमाणेच तैमुरचाही चेहरा अत्यंत बोलका आहे. ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘पू’ पासून ते ‘जब वी मेट’ मधील गीतच्या भूमिकेत करिनाच्या अभिनयाचा आणि तिच्या चेहऱ्यावरील विविध हावभावांचा परिचय तर आपल्या सर्वांनाच आहे. तिच्या याच हावभावांची विविधता तैमूरच्या चेहऱ्यावर सहज दिसून येतेय.

https://www.instagram.com/p/BU3jHcRDU5h/

https://www.instagram.com/p/BU6OZqYDrRB/

करीना तैमुरसोबत तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आली होती. यावेळी दोघांनीही निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. तैमुरच्या उपस्थितीमुळे या बर्थडे पार्टीची शान आणखीनच वाढली असे म्हणायला हरकत नाही. या बर्थडे पार्टीनंतर तुषार कपूरने मुलगा लक्ष्य आणि तैमुरचा एकत्र फोटो चाहत्यांसाठी शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/BU6CYiyl6Nc/

https://www.instagram.com/p/BU5qEcAF3PT/

https://www.instagram.com/p/BU3cLSmAG1m/