सध्या कलाविश्वामध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबद्ध झाल्या आहेत. यामध्येच आता लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, मौनी लवकरच दुबई स्थित एका बॅकरसोबत लग्न करणार आहे. सूरज नांबियार असं तिच्या प्रियकराचं नाव असून तो एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मौनीने मध्यंतरी सूरजसोबत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने सूरजसोबतचं नातं जाहीर केलं होतं. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या मौनीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून सध्या मौनी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.