बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनय कारकिर्दी सोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी एकटेपणाचा कसा सामना केला. याकाळात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचा खुलाला केला होता. अगदी कमी वयात नीना गुप्ता या वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवयन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होत्या. यावेळी त्यांना मसाबा ही मुलगी झाली. मात्र मसाबाच्या जन्मानंतर विवियन आणि नीना गुप्ता विभक्त झाले.

दरम्यान बराच काळ त्यांनी एकटेपणात घालवल्यानंतर वयाच्या ४९ वर्षी नीना गुप्ता पुन्हा प्रेमात पडल्या. ४९ वर्षी नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अशी झाली विवेक मेहरा आणि नीना गुप्ता यांची भेट

नीना गुप्ता यांनी एकटीने मुलगी मसाबाचा सांभाळ केला. या काळात त्यांना एकाकीपणा जाणवू लागला होता. दरम्यान २००२ सालामध्ये नीना गुप्ता आणि विवेक मेहरा यांची एका प्रवासा दरम्यान विमानात भेट झाली. विवेक मेहरा दिल्लीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत होते. ते पत्नीपासून विभक्त झाले होते. मात्र याबद्दल नीना गुप्ता यांना काही सांगण्यास त्यांना संकोच वाटतं होता. नीना गुप्ता आणि विवेह मेहरा यांच्यात मैत्री वाढली. यावेळी नीना गुप्ता यांचं वय ४२ वर्ष होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: बेबी बंप फ्लॉन करताना मंदिरा बेदीचा फोटो व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

४९ व्या वर्षी बांधली लग्नगाठ

नीना गुप्ता आणि विवेक मेहरा जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २००८ सालात विवेक मेहरा आणि त्यांच्या पत्नीच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. याच वर्षात नीना गुप्ता कुटुंबातील एका विवाहसोहळ्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. अमेरिकेचा हा दौरा त्यांच्यासाठी इतका खास ठरेल याची त्यांना कल्पना देखील नव्हती. अमेरिकेत जाऊन विवेक मेहरा यांनी नीना गुप्ता यांना लग्नासाठी प्रपोज केलं. नीना गुप्ता यांचा होकार मिळताच दोघांनी तिथेच लग्न केलं. खरं तर विवेक मेहरा संपूर्ण तयारीनेच गेले होते. फक्त नीना गुप्ता यांच्या होकाराची त्यांना प्रतिक्षा होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: कॅन्सरचं निदान झाल्यानंतर किरण खेर यांची पहिली झलक, मुलाला म्हणाल्या ‘लग्न कर’

अशी होती मुलगी मसाबाची प्रतिक्रिया

नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल मुलगी मसाबाची कशी प्रतिक्रिया होती यावर खुलासा केला होता. सुरुवातीला नीना गुप्ता यांच्या लग्नाच्या बातमीने मसाबा थक्क झाली होती. “तुला असं का करायचं आहे” असा प्रश्न मसाबाने उपस्थित केला होता.मात्र यावर नीना गुप्ता तिला म्हणाल्या, ” या समाजात सन्मान मिळवण्यासाठी लग्न गरजेचं आहे.” असं उत्तर नीना गुप्ता यांनी दिलं होतं. अर्थात नीना गुप्ता यांच्या लग्न करण्याच्या निर्णयाला मसाबाचा विरोध नव्हता.

Story img Loader