आशिकी २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर Shraddha Kapoor कधी कोणा गॅंगस्टरच्या बहिणीच्या भूमिकेत झळकेल असा साधा अंदाजही कोणीही बांधला नव्हता. पण, ही अभिनेत्री आता चक्क हसीना पारकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्य म्हणजे दाऊदची बहिण साकारताना ती ‘हसीना पारकर’ या चित्रपटात चार मुलांच्या आईच्या भूमिकेतही दिसणार आहे. यासाठी तिने बरीच मेहनतही घेतल्याचं दिग्दर्शक अपूर्व लाखियाने स्पष्ट केलं.

चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दृश्य काही कारणाने लांबलं त्यावेळी श्रद्धा चक्क त्या लहान मुलांचे सेटवर लाड करत होती, असं अपूर्वने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. ‘त्या मुलांची आई असल्याप्रमाणेच ती त्यांची काळजी घेत होती. मुख्य म्हणजे ज्या ताकदीने तिने हसीना पारकर साकारण्यासाठी मेहनत घेतली त्याच आत्मियतेने तिने गर्भसंस्काराची पुस्तकंही वाचली, त्यासोबतच तिने गरोदरपणात महिला कशा प्रकारे चालतात इथपासून प्रत्येक बारकाव्यांचा सखोल अभ्यासही केला’, असं म्हणत त्याने श्रद्धाची प्रशंसा केली.

वाचा : Tubelight Review : …अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली रेssss!

d

या चित्रपटात श्रद्धाच्या पतीच्या म्हणजेच इब्राहिमच्या भूमिकतेत अभिनेता अंकुर भाटिया झळकणार आहे. अंकुर आणि श्रद्धाचं नातं पडद्यावर अगदी प्रभावी वाटावं यासाठी त्यांना सेटवर लवकर बोलवण्यात यायचं आणि त्यांच्या ऑनस्क्रीन मुलांसोबत वेळ दिला जायचा. जेणेकरुन चित्रीकरणावेळी हवे तसे दृश्य टिपण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. त्यातून श्रद्धाने साकारेल्या हसीनाची झलक पाहायला मिळत होती. ‘गॉडमदर’पासून ‘गँगस्टर’पर्यंत येऊन थांबलेल्या हसीनाच्या प्रवासावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची टॅगलाइनही सध्या अनेकांची दाद मिळवत आहे. ‘अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्टमे हाजरी सिर्फ एक बार’ ही टॅगलाइल अनेकांनी शेअरही करत चित्रपटाविषयीची उत्सुकताही व्यक्त केली. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून, या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे.