बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्याच. सरतेशेवटी या चित्रपटाच्या सेटवर बी- टाऊनच्या या आघाडीच्या अभिनेत्रींची एण्ट्री झालीये तीसुद्धा अगदी दणक्यात. खुद्द सोनमनेच चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट केल्यामुळे यासंबंधीची माहिती मिळालीये. सोनमने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये अनुष्का आणि तिचा नवा लूकही पाहायला मिळतोय.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला अवघ्या १२ तासांत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय. न्यूयॉर्कमध्ये सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

या फोटोमध्ये सोनमने स्ट्रॅपी फ्लॉरल ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतेय. तिचा हा लूक पुन्हा एकदा ९० च्या दशकाचीच आठवण करुन देतोय. सध्यातरी एकंदर लूकवरुन सोनमच्या भूमिकेविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळत असून या तिच्या भूमिकेकडूनही प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. सोनमसोबतच अनुष्कानेही या चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. अतिशय व्यस्त वेळापत्रकातून अनुष्काने या चित्रीकरणाल हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय.

https://www.instagram.com/p/BWss-xzlwyH/

https://www.instagram.com/p/BWqZkveA6ZT/

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

‘नीरजा’ या चित्रपटानंतर सोनमच्या अभिनय कौशल्याला अनेकांनीच दाद दिली होती. त्यामुळे तिच्याकडून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट खऱ्या अर्था मल्टीस्टारर ठरत आहे. या चित्रपटातून बऱ्याच कलाकारांना नव्या लूकमधून पाहण्याची संधीही मिळणार आहे.

Story img Loader