अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते. उर्वशी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर उर्वशीच्या फोटोंची अनेकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चा पाहायला मिळते. नुकताच उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा असून उर्वशीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस् दिल्या आहेत.

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर मड बाथ घेतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत उर्वशीच्या संपूर्ण शरीरावर मातीचा लेप दिसून येतोय. कॅप्शनमध्येही उर्वशीने मड बाथचं महत्व सांगितलं आहे. “माझं फेव्हरेट मथ बाथ/स्पा/ मड थेरपी… क्लिओपात्रा यांना देखील मड बाथ पंसत होता. माझ्या सारखे मॉर्डन असलेले अनेकजण मड बाथ पसंत करतात. बेरिलीक बीचच्या लाल मातीचा आनंद घेतेय. रोमन देवी व्हीनस या मातीचा उपयोग आरशासाठी करायच्या. ही खनिजांनी समृद्ध अशी माती आहे जी त्वचेसाठी उत्तम आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली आहे.” असं म्हणत उर्वशीने या मडबाथचे अनेक फायदे सांगितले आहेत. दरम्यान, एका वृत्तानुसार उर्वशीने केलेल्या या मड बाथसाठी तिने तब्बल वीस हजार रुपये मोजले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे देखील वाचा: ‘पवित्र रिश्ता-२’मध्ये अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मानवच्या भूमिकेत

उर्वशीच्या या पोस्टवर अनेकांनी लाईकस् दिले आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. मड बाथ घेताना उर्वशीने केवळ बिकिनी परिधान केल्याचं दिसतंय. शरीरावर मातीचा लेप असल्याने तिचं संपूर्ण शरीर झाकलं गेलंय. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या आहेत. यात एक युजर म्हणाला, ” मुलांनो पाऊस येण्याची वाट पाहतोय.” तर दुसऱा युजर म्हणाला, “पावसामुळे माझ्या घरासमोरही खूप चिखल साचला आहे. कमी पडला तर मागू शकतेस..लाजू नकोस.” असं म्हणत युजरने उर्वशीची थट्टा केलीय.

urvashi-post
(photo- instagram@urvashirautela)

उर्वशी रौतेलाने सांगितले मड बाथचे फायदे

या मड बाथमुळे त्वचेतील अशुद्धता निघून त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. तसचं त्वचेतील रक्ताभिसरण वाढल्याने त्वचा मुलायम होत असल्याचं उर्वशी तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. तसचं मड बाथमुळे शरीरातील थकवा कमी होतो असं उर्वशी तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.

Story img Loader