२०१८ सालामध्ये आलेल्या ‘लवरात्री’ या सिनेमातून सलमान खानने आपल्या बहीणीच्या पतीला म्हणजेच आयुष शर्माला लॉन्च केलं होतं. आयुषसोबतच अभिनेत्री वरीना हुसैनने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये जम बसवणं वरीनाला एका गोष्टीमुळे खूपच कठीण गेलं. तिला मोठा संघर्ष करावा लागला. सुंदर असून देखील केवळ अफगाणिस्तानची असल्याने वरीनाला काम मिळणं कठीण झालं. अनेकांनी तिला ट्रोलही केलं. दहशतवाद्यांच्या देशातून आल्याचं म्हणत अनेकांनी वरीनाला काम देण्यास नकार दिला होता.
वरीनाचा जन्म अफगाणिस्तानमध्ये काबूलमध्ये झाला आहे. तिचे वडिल इराकचे आहेत तर आई अफगाणिस्तानची. अफगाणी असल्यानेच वरीलाना बॉलिवू़डमध्ये मोठा ब्रेक मिळण्यास मोठा संघर्ष करावा लागला होता. ‘लवरात्री’ सिनेमाच्या रिलीजपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत वरीनाने तिला कराव्या लागलेल्या संघर्षाचा खुलासा केला होता. करीयरच्या सुरुवातील अफगाणी असल्याने अनेकांनी ट्रोल केल्याचं ती म्हणाली होती. ती म्हणाली होती, “लोक म्हणायचे मी दहशतवादी आणि हल्ले होणाऱ्या देशातून आली आहे. मला याचा खूप त्रास व्हाय़चा”
View this post on Instagram
अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूड सिनेमांना मोठी पसंती दिली जात असल्याचं वरीना म्हणाली होती. वरीना पूर्वीपासूनच सलमान खानची मोठी फॅन होती. वरीना अफगाणिस्तानमधील काही म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे. वरीनाने न्यूयॉर्क फिल्म अॅकडमीमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर तिने मॉडेलिंग तसचं काही जाहिरातींमध्ये काम केलंय.
‘लवरात्री’ या सिनेमानंतर वरीना ‘दंबग ३’ सिनेमातील एका गाण्यात झळकली होती. ‘द इनकंप्लीट मॅन ‘ या सिनेमात वरीना लवकरच झळकणार आहे. यासोबतच ती काही दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.