हिंदी, मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू ( Reema Lagoo ) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी कोकिलाबेन रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव नयन भडभडे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा लागू यांचं नाव सुपरिचित होतं. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून मिळाला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमाताईंनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.

Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
9th anniversary of Manachi organization
‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, ‘कलयुग’ या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. ‘रिहाई’सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’ मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. सलमान खानच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती. बॉलिवूडच्या तर त्या लाडक्या ‘माँ’ होत्या. स्टार प्लस वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या ‘नामकरण’ या मालिकेत त्या काम करत होत्या. अशा या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या लाडक्या आईला ट्विटरवरून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चतुरस्त्र अभिनेत्री गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आपल्या सहज अभिनयाने नाट्य-चित्रपट आणि दूरचित्रवाणी गाजविणाऱ्या रिमा लागू यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. विनोदी आणि गंभीर भूमिका त्यांनी सारख्याच ताकदीने साकारल्या होत्या. विशेषतः आईची भूमिका आणि रिमा लागू हे एक समीकरणच रूढ झाले होते. तू तू मै मै, श्रीमान-श्रीमती यांसारख्या दूरचित्रवाणीवरील मालिकांसह पुरूष, घर तिघांचं हवं यासारख्या नाटकांतील त्यांच्या सशक्त भूमिका कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने केवळ अष्टपैलू अभिनेत्रीच नव्हे, तर एक संवेदनशील व्यक्तीही आपण गमावली आहे.

रुपेरी पडदयावरची लोकप्रिय आई गमावली – विनोद तावडे
आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या पूर्वीश्रमीच्या नयन भडभडे आणि आताच्या आपल्या सर्वांना परिचित असलेल्या रिमा लागू यांनी जवळपास चार दशके रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारही त्यांना काही वर्षांपूर्वी देण्यात आला होता. दमदार अभिनय, बोलका चेहरा आणि भारदस्त तरी तितकाच लाघवी आवाज यामुळे त्यांनी केलेले काम नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लाडकी आई काळाच्या पडदयाआड गेली असून, त्यांच्या निधनाने ही पोकळी भरून निघणे कठीण आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक मंत्री म्हणून आणि वैयक्तिक माझ्यावतीने मी त्यांना आदरांजली वाहतो.

अमिताभ बच्चन

लता मंगेशकर

ऋषी कपूर

आलिया भट्ट

रितेश देशमुख

सई ताम्हणकर

प्रिया बापट