बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सिनेमांचं कला दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्यावर सध्या आर्थिक संकट कोसळलं आहे. लीलाधर सावंत आपल्या पत्नीसोबत सध्या बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत. लीलाधर सावंत यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत  लीलाधर सावंत यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या बिकट परिस्थितीचा खुलासा केलाय.

एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत लीलाधर यांच्या पत्नीने सध्या ते खडतर आयुष्य जगत असल्याचं सांगितलं आहे. लीलाधर यांच्या दोन बायपास सर्जरी झाल्या असून त्यांना दोनदा ब्रेन हॅमरेजचे अटॅक आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारांवर सर्व पैसे खर्च झाले आहेत. दरम्यान लीलाधर यांना आता बोलणंही शक्य होत नाही. असं त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी सांगितलं. यावेळी पुष्पा यांनी सेलिब्रिटींकडे मदतीची याचना केली आहे. ज्या कलाकारांनी लीलाधर यांच्यासोबत काम केलंय त्यांनी मदतीसाठी पुढे यावं असं पुष्पा सावंत म्हणाल्या.

हे देखील वाचा: हार्ट अटॅक येणार हे मंदिराचे पती राज कौशल यांना आधीच लक्षात आलं होतं; काय घडलं होतं त्या रात्री?

‘हत्या’ या सिनेमासाठी लीलाधर यांनीच गोविंदाचं नाव सुचवलं होतं असं पुष्पा यांनी या मुलाखतीत सांगितलं. “सध्या आम्ही दोघं कठीण काळात असून मुश्किलीने आमचं जीवन व्यतीत करत आहोत.” असं पुष्पा म्हणाल्या.

लीलाधर सावंत यांनी ‘हत्या’, ‘110 डेज’, ‘दीवाना’, ‘हद कर दी आपने’ यांसारख्या जवळपासस १७७ सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केलंय. त्याना आजवर दादासाहेब फाळके तसचं फिल्मफेअर आणि इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.