चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे कलाकार नेहमीच प्रकाशझोतात असतात. या कलाकारांसोबतच त्यांचे कुटुंबियसुद्धा चर्चेत असतात. त्यातही या कलाकारांची मुलं म्हणजे अनेकांसाठी कुतुहलाचा विषय. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये असाच एक सेलिब्रिटी किड बराच चर्चेत आहे. तो म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुर.

नवाब सैफ अली खान आणि करिना यांचा हा छोटा नवाब त्याच्या जन्मापासूनच चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तैमुरच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्यावहिल्या फोटोला जितकी प्रसिद्धी मिळाली होती, अगदी तशीच प्रसिद्धी त्याच्या प्रत्येक फोटोला मिळते. काही दिवसांपूर्वीच तुषार कपूरच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत तैमुरचे सुरेख फोटो छायाचित्रकारांकडून टिपण्यात आले होते. त्यानंतर घराच्या गॅलरीत झोपाळ्यावर बसलेल्या या छोट्या नवाबाने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. त्याच्या या फोटोवरुन नजर हटत नाही तोच पुन्हा एकदा त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

वाचा : तैमुरला आशीर्वाद देणाऱ्या तृतीयपंथीयांवर पैशांचा पाऊस

img-20170708-wa0138

taimur

या फोटोंमध्ये तैमुर अगदी सुरेख दिसत असून त्याच्या सुपरक्युट फोटोवर बरेचजण फिदा झाले आहेत. अनेकांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअरही केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तैमुरला त्याच्या दाईने उचलून घेतल्याचं दिसत आहे. सर्वच लहान मुलांना खेळण्यांची फारच आवड असते. सैफिनाच्या या छोट्या नवाबाच्या बाबतीततही तसंच काहीसं झालेलं दिसत आहे. कारण त्याच्या दाईच्या हातात बरीच खेळणीसुद्धा पाहायला मिळत आहेत.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या संपूर्ण कपूर कुटुंबामध्ये तैमुर सर्वांचा लाडका झाला आहे यात शंकाच नाही. प्रत्येकजण त्याच्याविषयी भरभरुन बोलत असतो. काही दिवसांपूर्वीच सैफने आणि करिनानेही त्याच्याविषयी आपलं मत मांडलं होतं. कुटुंबियांच्या प्रेमाममध्ये मोठा होणार तैमुर नेमका कोणासारखा दिसतो यावरुन करिना आणि सैफमध्ये मजेशीर खटकेही उडतात.