तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळल्यापासून संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या स्थितीवर आहे. २० वर्षांनी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर संपूर्ण देशात दहशत माजवण्यास सुरुवात केलीय. इथल्या नागरिंकाचा छळ सुरु केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीय. तर अनेकांनी त्यांचे अफगाणिस्तानमधील काही अनुभव मांडले आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांनी देखील अफगाणिस्तानमध्ये शूटिंग करताना त्यांना आलेला भयानक अनुभव मांडला आहे. २००६ सालामध्ये कबीर खान ‘काबूल एक्सप्रेस’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीमसोबत अफगाणिस्तानला गेले होते. यावेळी जीवघेणे अनुभव आल्याचा खुलासा त्यांनी केलाय. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कबीर खान म्हणाले, “खरं सांगयचं तर ते खूपच भितीदायक होतं. जे काही घडलं ती खरं तर आम्हाला मारण्याची एकप्रकारे धमकी होती. आम्ही पहिली टीम असू जे तालिबाननंतर अफगाणिस्तानमध्ये शूटिंग करत करत होतो. त्यामुळे संपूर्ण मीडियाचं लक्ष आमच्यावर होतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Khan (@kabirkhankk)

पुढे ते म्हणाले, “अफगाणिस्तानमध्ये सर्व काही सुरुळीत सुरु झाल्यानंतर तिथे पहिल्यांदा एका सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तेही बॉलिवूड सिनेमाचं. त्यामुळे मीडियात येणारी दृश्य सीमेपार असलेल्या तालिबान्यांना खटकत होती. कारण त्यांनी सिनेमा, फोटोग्राफी यांवर बंदी आणली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. आमच्या टीमसाठी खरोखरच पाच लोकांना पाठवण्यात आल्याची माहिती आम्हाला भारतीय राजदूतांकडून मिळाली. त्यामुळे आम्हाला शूटिंग थांबवावं लागलं.” असं कबीर खान म्हणाले. यानंतर मात्र अफगाण सरकारने सुरक्षा पुरवण्याची टीमला हमी दिल्याचं ते म्हणाले.

दे देखील वाचा: “मुघल हे देश उभारणारे खरे शासक होते, चित्रपटांमध्ये त्यांना नकारात्मक भूमिकेत पाहून…”; दिग्दर्शकाच्या वक्तव्यावरुन नवा वाद

यावेळी कबीर खान यांनी अफगाणिस्तान सरकारचे आभारही मानले. तालिबान्यांच्या धमक्यांना न घाबरता पुढे जावं यासाठी अफगाण सरकारने पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय सिनेमा पूर्ण होवू शकला नसता असं कबीर खान म्हणाले.