करण जोहरच्या कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपल्या मुलांनाच जास्त वेळ देण्याऱ्या करणने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला आहे. सध्या तो ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये व्यग्र असून, नुकतंच या चित्रपटातील अभिनेत्रींची नावं त्याने सर्वांसमोर जाहीर केली आहेत.

अभिनेता टायगर श्रॉफ याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. करण जोहर आणि टायगर श्रॉफने सोशल मीडियावर या दोन्ही नवख्या अभिनेत्रींच्या फर्स्ट लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.

करणच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक फारच लक्षवेधी ठरत आहे. तिचा लूक पाहताच ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील काजोलने साकारलेल्या ‘अंजली’च्या भूमिकेची आठवण होतेय. एका पाटीवर एखादं चित्र रेखाटावं त्याचप्रमाणे अननन्याच्या मागे महाविद्यालयातील परिसर पाहायला मिळत आहे. ज्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाविषयी अनेकांनीच तर्क लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे करणची ही नवी ‘स्टुडंट’ अनेकांचीच मनं जिकतेय असं म्हणायला हरकत नाही.

ताराचा लूकही तितकाच आकर्षक ठरत आहे. ‘बेस्ट ऑफ लक निकी’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ताराचा ‘स्टुडंट…’मधील लूक फारच वेगळा आहे. अभिनयासोबतच तारा नृत्य आणि गायनाचंही तिला ज्ञान आहे. त्यामुळे करणची ही स्टुडंट बऱ्याच कलांमध्ये पारंगत आहे, असंच म्हणावं लागेल. करणच्या या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, आता नव्या स्टुडंट्सची ही टोळी प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

https://twitter.com/karanjohar/status/983942666131042304

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.