Dhadak, First Song Dhadak Hai Na. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘धडक’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं ‘धडक है ना’ हे गाणं येत्या काळात प्रेमाची नवी आणि वेगळी व्याख्याच सर्वांसमोर मांडेल यात शंका नाही.

अमिताभ भट्टाचार्य याने लिहिलेल्या या गाण्यात जान्हवी आणि इशानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळत आहे. गाण्याचे शब्द आणि त्याची चाल या साऱ्या घडी इतकी सुरेख बसली आहे, की या ‘धडक है ना’मुळे चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. मनाचा ठाव घेणारं हे गाणं सोशल मीडियावरही अवघ्या काही मिनिटांमध्येच चर्चेचा विषय ठरत आहे.

Ajit Agarkar's reaction to Hardik
T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

प्रेमात पडल्यानंतरचा प्रत्येक भाव या गाण्यात दिग्दर्शक शशांक खैतानने अगदी अचूकपणे टीपल्याचं पाहायला मिळत आहे. नजरेच्या भाषेतून होणारा संवाद असो किंवा मग आपल्या प्रिय व्यक्तीची एक झलक पाहण्यासाठी केलेला खटाटोप असो. अगदी लहानसहान गोष्टींतून प्रेम व्यक्त होण्याच्या पद्धतींना त्याने प्रकाशात आणलं आहे. २० जुलैला जान्हवी आणि इशानच्या मुख्य भूमिका असणारा ‘धडक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या ‘धडक’विषयी सध्या कलाविश्वात बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे आता मराठीत चित्रपटांच्या कमाईची आणि यशाची गणितं बदलणाऱ्या ‘सैराट’प्रमाणेच ‘धडक’ही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.