सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांमध्ये कल्पनाशक्ती आणि कलात्मकतेच्या जोरावर काही कलाकार मंडळी नावारुपास आली. तर अनेकांनी वेगळ्याच नावाने प्रसिद्धी मिळवली. सध्याच्या घडीला अशाच सोशल चर्चांच्या वर्तुळात असणारं एक नाव म्हणजे, ‘महाराष्ट्रीयन्स मीम्स’. अनेकांच्याच तोंडी या फेसबुक पेजचे नाव असून, त्यांच्या फॉलोअर्सचा आणि लाइक्सचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. चित्रपट, मालिका किंवा राजकीय नेतेमंडळींच्या भाषणातील काही व्हिडिओ किंवा फोटो घेऊन ‘महाराष्ट्रीयन मीम्स’ या पेजवर त्याला अफलातून टच देण्यात येतो. यावेळी महाराष्ट्रीयन मीम्सने असाच एक कलात्मक व्हिडिओ शेअर केला आहे.

‘पद्मावत’ या चित्रपटातील ‘खलीबली’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांनीच ‘महाराष्ट्रीयन मीम्स’च्या फेसबुक पेजवरुन खिल्जी तात्या सर्वांच्या भेटीला आले. ‘बाबा मीम’वाले या पेजवरुन पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ महाराष्ट्रीयन मीम्सने त्यांच्या पेजवरुन रिपोस्ट केला. ज्यामध्ये ‘खलीबली’ या गाण्याची दृश्य सुरु असतानाच चक्क ‘जोगवा’ या चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं वाजतंय. मुख्य म्हणजे त्या गाण्याची चाल आणि रणवीरचे त्यावर सुरु असणारे नृत्य याचा मोठ्या कलात्मकतेने मेळ साधला गेला असून, तो जणू काही ‘लल्लाटी भंडार’वरच नाचतोय असा भास काही क्षणांसाठी होतो.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

आतापर्यंत या व्हिडिओला बरेच लाइक्स मिळाले असून, अनेकांनी तो शेअरही केला आहे. तेव्हा आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रणवीरपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो का आणि तो पोहोचला तर, रणवीर त्यावर कसा व्यक्त होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या गाण्याचे मीम इतक्या मोठ्या पातळीवर लोकप्रिय होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हल्ली मीम्स हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच एखाद्या चित्रपटाचा नुसता ट्रेलर जरी प्रदर्शित झाला तरी त्यामधील डायलॉग किंवा गाण्याचा मोजका भाग वापरून नेटकऱ्यांकडून मीम्स तयार केली जातात. हे मीम्स पाहून अनेकदा नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला खरंच दाद द्यावीशी वाटते.