विविध कथानक, गतकाळातील काही महत्त्वाचे प्रसंग यांची सुरेख मांडणी करत मोठ्या प्रभावीपणे हे प्रसंग सध्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे चित्रपट. कलाविश्वात अनेक दिग्दर्शकांनी या माध्यमाचा अतिशय समर्पक वृत्तीने वापर केला. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर याचं. ऐतिहासिक कथानकांचं प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या आशुतोषच्या चित्रपटांविषयी काही बोलावं तितकं कमीच. असा हा दिग्दर्शक पुन्हा एकदा दमदार कथानकासह एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना पुन्हा रुपेरी पडद्यावर जिवंत करणार आहे. सध्या तो या आगामी चित्रपटासाठी रेकी अर्थात चित्रीकरणासाठी योग्य अशा ठिकाणांची पाहणी करत आहे.
काही दिवसांपूर्वीच आशुतोषने ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने सोशल मीडियावरुन या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करत अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांची चित्रपटात निवड केली असल्याचंही जाहीर केलं होतं. बिग बजेट प्रोजेक्ट असणाऱ्या ‘पानिपत’चं महत्त्वं पाहता चित्रीकरणासाठी आता संपूर्ण टीमसह खुद्द आशुतोषही तयारीला लागला आहे. यासाठी त्याने कथानकाला साजेशा काही जागा हुडकण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला तो नाशिक परिसरात या चित्रपटाचा सेट लावण्यासाठी जागा शोधत आहे.
The Hunt Begins for #Panipat !!! #Recce @AshGowariker ‘s next ~ #Panipat – The Great Betrayal
Starring @arjunk26 @duttsanjay & @kritisanon releases on December 6,2019!@agpplofficial @visionworldfilm @RohitShelatkar
लगान, स्वदेस,जोधा अकबर,खेले हम.. आशुचा शोध व अभ्यास सखोल pic.twitter.com/wR6C6GOA8k— Dilip Thakur (@DilipThakur2007) April 3, 2018
‘लगान’, ‘स्वदेस’ म्हणू नका किंवा मग ‘मोहेंजोदारो’. प्रत्येक चित्रपटापूर्वी आशुतोष रेकी करत चित्रपटाच्या सेटसाठी सुयोग्य जागा निवडण्याला नेहमीच प्राधान्य देताना दिसतो. वाईपासून ते अगदी गुजरात, जोधपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी जेथे त्याच्या चित्रपटातील ऐतिहासिक कथानक आणखी उठावदार दिसेल त्याच जागांची निवड करायला तो प्राधान्य देतो. तेव्हा आता ‘पानिपत’साठी तो नेमकी कोणत्या ठिकाणाला पसंती देतो आणि या चित्रपटाच्या सेटचीआखणी नेमकी कोणत्या पद्धतीने करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.