राज कपूरच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे, त्याच्याच दिग्दर्शनातील चित्रपटातील गाण्यांचे रुपेरी सादरीकरण.

मेहबूबा.ओ मेहबूबा
मेरे दिल के पास हो
तुम मेरी मंझिले

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

पटकन ‘संगम'(१९६४) चित्रपटातील राज कपूर आठवला ना? एका निसर्गरम्य स्थळावरील नदीत स्वयंचलित छोट्या बोटीतून प्रवास करताना पुढील प्रवाशी बोटीत असणार्‍या वैजयंतीमालाला उद्देशून तो विनवणी करतोय. ती मात्र स्तब्ध आहे. राज कपूर कशी बरे आपली समजूत घातलोय हे पाहूया असे तिच्या चेहर्‍यावर भाव आहेत.

किस बात से नाराज हो
किस बात का है गम
किस चीज मे डूबी हो तुम
हो जायेगा संगम

राज कपूर आणखीनच मोकळेपणाने गात समजूतीचा स्वर लावतो. मुकेशच्या पार्श्वगायनाशी राज कपूरचे व्यक्तिमत्व जुळले होते म्हणा अथवा अभिनय व गायन यांचे सूर जुळले होते म्हणूयात. पण राज कपूर गातोय हा फिल मिळतो हे महत्त्वाचे! हसरत जयपुरीच्या गीताला शंकर जयकिशन यांचे संगीत याचे देखिल आर. के. फिल्मच्या चित्रपटाशी छान नाते जुळलेले…

बाहो के तुझे हार मै पहनुंगा
एक दिन
सब देखके रह जायेंगे
ले जाऊंगा एक दिन

एव्हाना राज कपूर वैजयंतीमालाच्या छोट्या लॉन्चपर्यंत येऊन तिला आपल्या लॉन्चमध्ये खेचून घेतो. ती देखील तो अनुभव छान एन्जॉय करतेय. तर या दोघांचा तिसरा मित्र राजेंद्र कुमार काठावर उभा राहून ही सगळी मस्ती पाहतोय. त्याच्या चेहर्‍यावर मात्र वैजयंतीमालावरचे प्रेम व्यक्त होतेय. त्या काळातील हा प्रेम त्रिकोणावरचा सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट होय. तो गीत संगीतामधून अधिकच खुलला.
रुपेरी पडद्यावर नायिकेवर हक्काने व हट्टाने प्रेम करतानाच असोशी व कमालीची उत्कटता साकारावी ती राज कपूरने! पडदाभर प्रेम वाहत राहणे हे राज कपूरचे वैशिष्ट्यच. फक्त जरा कुठे संधी मिळू देत.

ओ मेहबूबा, मेरे दिल के पास है तेरी
दिलीप ठाकूर