‘हॉलिडे – अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी’ या २०१४ साली आलेल्या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन ए आर मुर्गदास यांचे असून निर्मिती विपुल शाह यांनी केली होती. यात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या फरहादने यात खलनायकाची भूमिका साकारलेली. अभिनेता गोविंदाने चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेली.

तिने जुळ्यांना जन्म दिला, पण…

६ जून २०१४ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटानंतर अक्षयच्या चित्रपट निवडीत बराच बदल घडून आल्याचे दिसले. अतिशय विचारपूर्वक, देशभक्ती दर्शवणारे आणि सामाजिक भान राखणारे चित्रपट निवडण्यासाठी तो ओळखला जाऊ लागला. ६०व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये त्याला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘हॉलिडे’ हा एका तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे नाव तुम्हाला ओळखायचे आहे.

प्रश्न – अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ कोणत्या चित्रपटाच रिमेक आहे?
पर्याय
१. डुकूडू
२. थुप्पक्की
३. स्टॅलिन

तैमुरच्या आत्तेबहिणीचं नाव माहिती आहे का?

गेल्या काही वर्षांपासून अक्षयच्या चित्रपट निवडींमध्ये बराच फरक आल्याचे दिसत येत असून, तो खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा ‘खिलाडी’ ठरतोय. ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’, ‘जॉली एलएलबी २’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
आमिरने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?
उत्तर – दलजित