चित्रपटाच्या कथानकाचा भाग म्हणून रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांमधून ‘शुभमंगल’ करणारे काही कलाकार प्रत्यक्ष जीवनात अद्यापही अविवाहित आहेत. यामध्ये संगीत आणि दिग्दर्शनासारख्या चित्रपटाशी निगडीत अन्य क्षेत्रातील व्यक्तींचादेखील समावेश आहे. बॉलिवूडमधील काही अविवाहितांवर एक दृष्टिक्षेप…
सलमान खान – बॉलिवूडमधील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर्स’मध्ये सलमानची गणना होते. ५१ वर्षीय सलमान अद्यापही सिंगल आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले. परंतु, त्याच्या प्रेमाची गोष्ट लग्नापर्यंत पोहोचलीच नाही.
तब्बू – ४३ वर्षीय अभिनेत्री तब्बू ही शबाना आझमीची भाची आहे. तब्बूला अद्याप मनासारखा जोडीदार मिळालेला नाही. (photo source- Indian express)
नेहा धुपिया – कोचीमध्ये जन्माला आलेल्या नेहाने अनेक चित्रपटांमधून अभिनय केला. नेहाचे वय ३६ वर्षे असून, अद्याप तिने लग्न केलेले नाही. (photo source- Indian express)
अमिषा पटेल – ‘कहो ना प्यार हैं’ या प्रसिद्ध चित्रपटातून ह्रतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अमिषाने तेलगु चित्रपटांमधूनदेखील भूमिका साकारल्या आहेत. अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेलेली अमिषा अद्याप सिंगलच आहे. (photo source- indian express)
मिका सिंग – आपल्या गाण्याने लाखो लोकांची मनं जिंकणारा बॉलिवूडचा गायक मिका सिंगला अद्याप जीवनसाथी सापडलेली नाही. अनेक तरुणींसोबत नाव जोडले गेलेला मिका अजूनही सिंगलच आहे. (photo source- Indian express)
नर्गिस फाखरी – अमेरिकेत मॉडेलिंग करणाऱ्या नर्गिस फाखरीने काही बॉलिवूडपटांमधून अभिनय केला. ३७ वर्षीय नर्गिसचे अद्याप लग्न झालेले नाही. (photo source- indian express)