बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांसाठी पटकथा लिहिणाऱ्या एका लेखकाला ऑनलाइन फसवणूकीच्या आरोपाखाली मुंबई पोलिंसानी अटक केली आहे. शुभम पीताम्बर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव आहे. हा व्यक्ती आपल्या प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी इतर लोकांसोबत आर्थिक फसवणूक करत होता. परिणामी ओशिवरा पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत.

अवश्य पाहा – चला आत्मनिर्भर होऊया; बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी सोनू सूद देतोय रिक्शा

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या लेखकाची प्रेयसी एक युट्यूबर आहे. युट्यूब कॉन्टेटसाठी ती विविध शहरांना भेट देत असे. दरम्यान यासाठी लागणारी आर्थिक मदत आरोपी व्यक्ती करत होता. परंतु लॉकडाउनमुळे त्याचीही आर्थिक स्थिती ढासळली. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. परिणामी त्याने ऑनलाईन फसवणूकीचा मार्ग निवडला.

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिकडेच त्याने मुंबईतील एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीसोबत फसवणूक केली. त्याने या कंपनीला खोटे मेसेज दाखवून जवळपास ३२ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीदरम्यान अशा प्रकारे त्याने अनेकांसोबत फसवणूक केल्याची माहिती समोर आली. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.