मनोरंजन विश्वातले सर्वाधिक चित्रपट हे ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाले. एकूण ७ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाले होते. मात्र यामध्ये केवळ दोनच चित्रपटानं बाजी मारली असून योगायोग म्हणजे हे दोन्ही चित्रपट आयुषमान खुरानाचेच होते. त्यामुळे आयुषमानचा आनंद खऱ्या अर्थानं द्विगुणित झालाय असं म्हणता येईल. मात्र उर्वरित पाच चित्रपट हे फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या कोणत्या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळाला , कोणत्या चित्रपटानं किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
#BoxofficeVerdict…
Note: Films released in Oct 2018#AndhaDhun: HIT#LoveYatri: FLOP#HelicopterEela: FLOP#Jalebi: FLOP#NamasteEngland: DISASTER#BadhaaiHo: SUPER HIT#Baazaar: BELOW AVERAGE Week 1 [better in Mumbai circuit]
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) November 2, 2018
लव्ह यात्री
सलमान खानची निर्मिती असलेला लव्ह यात्री हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला. या चित्रपटातून ‘कॅडबरी गर्ल’ वरिना हुसैन आणि सलमानची बहिण अर्पिताचा खानचा नवरा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानं ११.२२ कोटींची कमाई केली.
अंधाधून
आयुषमान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला अंधाधून हा चित्रपट देखील ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. मर्डर मिस्ट्रीवर आधारित या चित्रपटानं ६४.५५ कोटींची कमाई केली.
हेलिकॉप्टर इला
आई- मुलाच्या नात्याची गोष्ट उलगडणारा हेलिकॉप्टर इला हा चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र या चित्रपटानं केवळ ४.१३ कोटींची कमाई केली. काजोलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला.
तुंबाड
तुंबाड चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट अनेकांना आवडला. कोणतीही प्रसिद्धी किंवा सुपरस्टार किंवा फारसे सिनेमागृह उपलब्ध नसतानाही या चित्रपटानं १० कोटींहून अधिकची कमाई केली.
नमस्ते इंग्लंड
अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला ‘नमस्ते इंग्लड’ १९ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र जोरदार आदळला. केवळ आठ कोटींची कमाई चित्रपटानं केली.
बधाई हो
अमित शर्मा दिग्दर्शित आयुषमान खुरानचा बधाई हो या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं एकूण ९४. २५ कोटींची कमाई केली आहे.
बाजार
अभिनेता सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंग याची प्रमुख भूमिका असलेला बाजार गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आतापर्यंत १५ कोटींची कमाई केली आहे.