|| रेश्मा राईकवार

एका वीस वर्षांच्या मुलीच्या अपूर्ण इच्छा चाळीस वर्षे चाकोरीबद्धतेने जगणाऱ्या गृहिणीच्या आयुष्यात अपघाताने येतात. त्या तिच्या जगण्याचा उद्देश बनतात तेव्हा तिचे जग बदलले नाही तर नवल म्हणायला हवे. अर्थात हा बदल तिच्या जाणीव-नेणिवांवर अवलंबून असतो तेवढाच तिच्यातला बदल तिच्या जवळचे कशा पद्धतीने स्वीकारतात यावरही तिच्या जगण्याची कथा सुफल-संपूर्ण होते की अधुरी कहाणी राहते हे ठरते. ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटात ही कहाणी अधुरी कशी राहील? एकतर माधुरीच्या मोहक अदा त्याच नखऱ्यांसह पाहण्याचा आनंद देणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या स्मृतींवरची मोहिनी पुन्हा चाळवली आहेच. तिच्याबरोबर हिंदीतील नायक-नायिकांचा हळवा, भाबडा प्रणय आणि गोड, आशादायी जगण्यांच्या कल्पनांनी भरलेली ‘बकेट’ मराठीजनांच्या वाटय़ाला आली आहे.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

पुण्यातील उच्चमध्यमवर्गीय कुटुंबाची ही ‘बकेट लिस्ट’ आहे. सासू-सासऱ्यांची बिनतिखट भाजी, नवऱ्याची खोबरे न पेरलेली, मुलीची खोबरे पेरलेली आणि इतरांसाठी या सगळ्यांचे मिश्रण असलेली अशा रोजच्या चार भाज्या आनंदाने बनवणारी, नवऱ्याच्या डब्यापासून पाकीट, रुमाल, घडय़ाळासह त्याचे आईवडील सांभाळणारी, मुलांचे मायेने करणारी आदर्श गृहिणी मधुरा सानेच्या (माधुरी दीक्षित) गोड विश्वात सईच्या ‘बकेट लिस्ट’मुळे उलथापालथ होते. सईच्या हृदयाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने मधुरा तिच्या अपूर्ण इच्छांची यादी एकेक करत पूर्णत्वाला नेते. या प्रक्रि येत सान्यांची सून मधुरा ते मुळातच हरहुन्नरी, मनस्वी असलेली मधुरा हा तिच्या स्वत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे असे अजिबात नाही. कारण काहीही असेना स्वत:भोवतीच्या कोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सोपा नसतो, त्यातूनही तावून-सुलाखून बाहेर पडलेच पाऊल तर स्वत:सह आजूबाजूचे जग बदललेले असते. स्वत:ची ओळख, जगण्याचा उद्देश शोधणारा हा प्रवास याआधी आपण गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातूनही पाहिला होता. तसाच नायिकेचा प्रवास इथेही पाहायला मिळतो अर्थात ही मूळ संकल्पना वगळता दोन्ही चित्रपटांची मांडणी फार वेगळी आहे. मराठीत हे असे विषय आताशा नव्या दिग्दर्शकांच्या मांडणीतून अनुभवायला मिळतायेत. ‘बकेट लिस्ट’ हा त्या यादीतला ताजा चित्रपट आहे.

एका उत्तम कथेतील पात्रे रंगवण्यासाठी तुमच्याकडे माधुरी दीक्षित आणि सुमीत राघवन यांच्यासारखे कसलेले कलाकार असतील तर त्याला उत्तम दिग्दर्शन, चुरचुरीत संवाद, उत्तम गाणी-संगीत, पाश्र्वसंगीत या सगळ्यांची जोड देत एक सुंदर कलाकृती देणे हे दिग्दर्शकाच्या खांद्यावरचे शिवधनुष्य तेजस देऊस्कर यांनी सहजी पेलले आहे. माधुरीचा मराठीतला तोही तिच्या वयाला साजेशी व्यक्तिरेखा-अभिनय, तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा, खटय़ाळपणा, प्रणयी माधुरी आणि काही सेकंदांपुरता का होईना तिचे नृत्यही.. तिच्या चाहत्यांच्या ज्या ज्या म्हणून इच्छा असतील त्या ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करतो. आणखी एक अनपेक्षित इच्छा हा चित्रपट पूर्ण करतो ते म्हणजे सुमीतला अगदी शाहरूख खान स्टाइलमध्ये बाहू पसरून माधुरीचा हिरो म्हणून प्रेमगीत साकारताना पाहणे ही दुर्मीळ गोष्ट रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षात उतरली आहे. सुमीत राघवनला अशा ‘हिरो’ स्टाइल भूमिकांमधून पाहण्याची मराठी रसिकांची इच्छा या चित्रपटाने पूर्ण केली आहे. मधुराच्या पतीच्या मोहनच्या भूमिकेत सुमीतला पाहणे हा लाजवाब अनुभव ठरला आहे. भूमिकेला मर्यादा असूनही मधुरापेक्षा मोहित अंमळ जास्त भाव खाऊन गेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जोडीला सुमेध मुद्गलकर, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, दिलीप प्रभावळकर, रेणुका शहाणे, मिलिंद पाठक आणि शुभा खोटे अशी नव्या-जुन्या कलाकारांची सुरेख गट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आलेली आहे. चित्रपटात वेगळेपणा अजिबात नाही, कथा ठरवल्या पद्धतीने सरळ पुढे जात राहते आणि सुखांत असा हा चित्रपट आहे याची जाणीव पदोपदी मनात असल्याने एका मर्यादेपलीकडे भावनांचं नाटय़ यात रंगत नाही. पण तरीही अशा हळव्या कथेला जे जे मिळायला हवे ते दिग्दर्शकाने पुरेपूर दिले असल्याने ही ‘बकेट लिस्ट’ अनुभवण्याजोगी ठरली आहे. चित्रपटात तीनच गाणी आहेत. ‘माझ्या मना’, ‘तू परी’ आणि ‘होऊन जाऊ द्या’ ही तिन्ही गाणी सुंदर आहेत. ‘माझ्या मना’ हे गाणे खुद्द दिग्दर्शकाने लिहिलेले आहे. हे गाणे चित्रपटात पाश्र्वसंगीतासारखे वाजत राहते. मंदार चोळकर यांनी लिहिलेली आणि रोहन रोहन यांनी संगीत दिलेली गाणी श्रवणीय आहेत. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, छायाचित्रणाच्या जोरावर ही ‘बकेट लिस्ट’ हटके नसली तरी आकर्षक नक्कीच आहे!

  • चित्रपट : बकेट लिस्ट
  • ‘बकेट लिस्ट’
  • दिग्दर्शक- तेजस प्रभा विजय देऊस्कर

कलाकार- माधुरी दीक्षित, सुमीत राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, दिलीप प्रभावळकर, सुमेध मुद्गलकर, रेणुका शहाणे, मिलिंद पाठक, शुभा खोटे, कृतिका देव, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, अथर्व बेडेकर, रेशम टिपणीस.

Story img Loader