बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिची मतं अगदी स्पष्ट आणि परखडपणे मांडते. कोणाचेही दडपण न घेता आणि मनात जे असेल ते स्पष्टपणे बोलणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. नुकतेच तिने चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवण्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांमध्ये उभं राहण्याची गरज नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे तिने स्वागत केले.

वाचा : ‘हम आपके है कौन’च्या सेटवर अनुपम खेर यांना आला होता अर्धांगवायूचा झटका

चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती मला योग्य वाटत नाही, असे मत विद्याने एका कार्यक्रमात व्यक्त केले. ती म्हणाली की, शाळेत दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने करावी लागते. पण चित्रपटगृह म्हणजे काही शाळा नाही, असे मला वाटते. माझ्या देशावर माझे प्रेम असून देशाचे रक्षण करण्यास मी नेहमीच तत्पर असते. पण त्यासाठी मी काय करावे, हे मला दुसऱ्या कुणीतरी येऊन सांगण्याची गरज नाही. मी जेव्हा-जेव्हा राष्ट्रगीत ऐकते, तेव्हा हातातले काम सोडून स्तब्ध उभी राहते. अनेक सेलिब्रिटी सध्या या वादावर आपले मत मांडत आहेत.

वाचा : ‘सीआयडी’मधील सदस्याच्या निधनाने शिवाजी साटम यांना बसला धक्का

नुकतेच अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता अरबाज खान यांनीही राष्ट्रभक्ती कोणावर थोपवली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते.

Story img Loader