नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शेहशहा’ सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. १९९९ सालामध्ये कारगील युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्यावर आधारित या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्यासोबतच त्यांची प्रेयसी डिंपलच्या त्यागाची देखील कथा देशवासियांना कळाली. कॅप्टन विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर डिंपल चीमा यांनी अद्यापही लग्न केलेलं नाही.
एका मुलाखतीत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी डिंपलला लग्न करण्याचा सल्ला दिला होता असा खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांनी सांगितलं, ” आमच्या वाढदिवसाला ती वर्षातून दोनदा तरी फोन करते. डिंपल आणि विक्रममध्ये खूप प्रेम होतं. कारगील यद्धात विक्रम शहीद झाल्यानंतर आम्ही तिला लग्न कर असं म्हंटलं होतं कारण तिच्यासमोर उभं आयुष्य होतं. तिच्या कुटुंबियांनी देखील तिला लग्न कर म्हंटलं होतं. मात्र तिने साफ नकार दिला. तिला आयुष्यभर लग्न करायचं नसून तिला विक्रमच्या आठवणींसोबत जगायचंय असं तिने स्पष्ट केलं”
View this post on Instagram
पुढे या मुलाखतीत विक्रम बत्रा यांचे वडील म्हणाले, “विक्रमने डिंपलसोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल मला सांगितलं होतं. या निर्णयात मी त्यांच्यासोबत असल्याचं त्यांना सांगितलं होतं. डिंपल ही एक गुणी मुलगी असून तिला नातेसंबंधांच महत्व माहितेय, हे मला आधीपासूनच ठाऊक होतं.”असं ते म्हणाले.
या सिनेमामुळे डिंपल चीमा खूपच भावूक झाली असल्याचं तसचं या सिनेमातील गाणं पाहून अश्रू अनावर झाल्याचं कियाराने एका इंटव्हूमध्ये सांगितलं. या सिनेमा पाहून डिंपल यांनी कियाराला मेसेज केला असल्याचं ती म्हणाली.