बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख लवकरचं हाउसफुल ३ या विनोदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, लिसा हेडन, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाख्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे सध्या प्रमोशनही सुरु आहे. यादरम्यान आपल्याला धक्का बसेल असा एक व्हिडिओ समोर आलायं.
एका शॉपच्या सीसीटीव्हीत रितेश कपडे चोरताना कैद झाला आहे. या व्हिडिओत रितेश त्याला आवडलेले कपडे गुपचुप घेऊन जाताना दिसतो. आता तुम्ही म्हणाल, एवढा मोठा अभिनेता मग त्याला असं काही करण्याची गरजचं काय? यामागचे कारण आम्हालाही अद्याप कळलेले नाही. पण हा व्हिडिओ २० तारखेपासून सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओसाठी #ChorInTheStore असा हॅशटॅगही वापरला जातोय.
बहुदा हा हाउसफुल ३च्या प्रमोशनासाठी वापरण्यात आलेला फंडा असावा. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेकवेळा नवनवे प्रयोग केले जातात. यापूर्वी जेनेलिया आणि शाहिद संपूर्ण रात्र गाडीत बसून राहिले होते. त्यांच्या चान्स पे डान्स या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा प्रयोग करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: कपड्यांची चोरी करताना रितेश सीसीटीव्हीमध्ये कैद!
रितेशला असं काही करण्याची गरजचं काय?
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 24-05-2016 at 12:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caught on cctv riteish deshmukh shoplifts inside a store