अगं, तो मुलगा बघ कसला हॅण्डसम आहे…. कॉलेजच्या कट्ट्यावर बसल्यावर अशी वाक्य सहज आपल्या कानावर पडतात. कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मुलं असो किंवा मुली, केवळ समोरचा व्यक्ती कसा दिसतोय यावरूनच त्यांच्यावर भाळतात. पण, आपण आज ज्या अभिनेत्रीच्या क्रशबद्दल जाणून घेणार आहोत तिच्यासाठी मात्र या गोष्टी गौण आहेत. खरंतर तिच्या मते दिसण्यावरून कोणालाही पारखणं हे मुळातच चुकीचंच आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुरुचीचा चेहरा आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला. लवकरच ती डॉक्टर ‘अंजली’च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येतेय. सालस दिसणाऱ्या आणि मंजुळ आवाज असणाऱ्या सुरुचीने अनेक तरुण मुलांच्या हृदयात जागा मिळवली. पण, तिच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘ती’ व्यक्ती कोण? हे आजवर कोणालाच कळलेले नाही.

मुळातच रंग, रुप या गोष्टींवर सुरुचीचा विश्वास नाही. ‘ओह माय गॉड …..’ हा मुलगा किती छान दिसतो असं म्हणत मला कोणावरच क्रश झालं नाही. ‘क्रश’ हा प्रकार माझ्या आयुष्यात कधी घडलाच नाही. मात्र, मला प्रेरणा मिळेल अशा अनेक व्यक्ती माझ्या जीवनात आल्या. कोणी छान काही सांगतंय, बोलतंय किंवा कोणाला उत्तम ज्ञान आहे यावरून मला व्यक्ती आवडतात. केवळ कोणीतरी दिसायला सुंदर आहे म्हणून मला तसं क्रश कधीच झालं नाही. पण, शाहरुख खान मला प्रचंड आवडतो. विशेष म्हणजे तो खूप प्रसिद्ध आहे किंवा तो बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतो यामुळे त्याच्यावर माझं क्रश नाहीये. त्याचा आजवरचा जीवनप्रवास हा कौतुकास्पद असून, त्यामुळे मला प्रेरणा मिळते. कोणीही ‘गॉडफादर’ नसताना त्याने मुंबईत येऊन स्वतःचं आयुष्य घडवलं, ते सोपं नाहीये. त्याच्या आजवर ज्या काही मुलाखती मी पाहिल्या, वाचल्या त्यामुळे तो सकारात्मक दृष्टीकोन असलेला व्यक्ती असल्याचं कळतं. त्याच्या मुलाखती नेहमीच प्रेरणादायी असतात. मला त्याच्यावर ‘वाव, आय लव्ह हिम’ म्हणावं असा क्रश नाहीये. तर ‘वाव, आय रिस्पेक्ट हिम’ असा क्रश आहे.
एकंदरीत सुरुचीच्या हृदयात स्थान मिळवणं सोप नाहीये, हे सर्वांना कळलंच असेल. तसेच, तिची आवडही आता तरुणांना नक्कीच कळली असेल असं म्हणण्यास हरकत नाही.

Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
son abram angry on father shah rukh during kkr vs dc ipl 2024 match funny video goes viral on social media
VIDEO : शाहरुखने गळा पकडताच भडकला लेक अबराम; डोळे वटारले आणि मग…? किंग खानची प्रतिक्रिया होतेय व्हायरल
why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
a groom talking on a mobile phone in front of gurujee and bride on wedding day
Video : “कॉल किती महत्त्वाचा असेल!” समोर भटजी व नवरी अन् भर मांडवात नवरदेव फोनवर बोलत होता, नेटकरी म्हणाले, “मॅनेजरचा कॉल..”

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com