राज कुंद्रा पॉनोग्राफीच्या गुन्ह्यात मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमनने केलेल्या एका दाव्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सागरिकाने दावा केला होता की राज कुंद्रा चित्रपटात सेलिना जेटली, नेहा धूपिया, किम शर्मा, अर्शी खान आणि नोरा फतेही सारख्या लोकप्रिय अभिनेत्रींना कास्ट करण्याचा विचार करत होता. मात्र, आता या सगळ्यावर अभिनेत्री सेलिना जेटलीच्या प्रवक्त्याने वक्तव्य केलं आहे. राज कुंद्राच्या ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपसाठी नाही तर शिल्पा शेट्टीच्या ‘जेएल स्ट्रीम’ अ‍ॅपसाठी विचारण्यात आल्याचं सेलिनाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सेलिनाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सेलिना जेटलीला शिल्पा शेट्टीने संपर्क साधला होता. त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शिल्पा ‘जेएल स्ट्रीम’ अॅप चालवते, या अॅपसाठी सेलिनाशी संपर्क साधण्यात आला होता. तिला ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपसाठी कोणतीही ऑफर मिळाली नाही. तिला तर याबद्दलही माहित ही नाही,’ असे सेलिनाचा प्रवक्ता म्हणाला.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

‘सेलिनाने शिल्पा शेट्टीच्या अ‍ॅपसाठी काम केले का असे विचारले असता?’ तेव्हा प्रवक्त्याने सांगितले, ‘नाही, सेलिनाने आधीच काही प्रोजेक्टवर काम करण्यासाठी होकार दिला होता, म्हणून ती शिल्पाच्या अ‍ॅपसाठी काम करू शकली नाही. त्या अ‍ॅपसाठी काम करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींकडेही संपर्क साधण्यात आला होता.’

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

राज कुंद्राची त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी फोर्ट मॅजिस्ट्रेटमध्ये सुनावणी होणार आहे. राजला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. २० जुलै रोजी त्याला किला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता मंगळवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.