सर्व प्रेक्षकांचा लाडका अभिनेता भाऊ कदम bhau kadam याला काही गुंडांनी चक्क पिस्तुलाच्या धाकावर रोखले होते. घाबरलात ना… आमच्या लाडक्या भाऊला काही झालं तर नाही ना… असा प्रश्न नक्कीच तुमच्या डोक्यात आला असेल. पण भाऊ अगदी सुखरुप असून त्याला काहीही झालेलं नाही. खरंतर भाऊवर खऱ्या गुंडांनी पिस्तुल रोखली नव्हती. तर हे सर्व त्याच्या आगामी स्किटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
वाचा : करिना नव्हे तर या अभिनेत्रींनीही केलंय गरोदरपणात काम
थुकरवाडीत काही ना काही हास्यास्पद घटना घडतच असतात. सध्या ‘चला हवा येऊ द्या’मधील थुकरवाडीतील ही मंडळी भारत दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यानच स्टुडिओबाहेर हा व्हिडिओ काढण्यात आला. या व्हिडिओत हातात पिस्तुल असलेले दोन गुंड भाऊ कदमला पिस्तुल दाखवून त्याला लुटण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत यात श्रेया बुगडेही दिसतेय. अखेर साधा भोळ्या भाऊ कदमला कुणी कसं वाचवलं ते तुम्ही व्हिडिओतच पाहा….
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर दिसणार बाहुबलीचं अनोखं रुप
चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर ‘माहेरची साडी’ पासून ते ‘नटसम्राट’, ‘सैराट’पर्यंत आणि हिंदीतील ‘तिरंगा’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पासून आजच्या ‘दंगल’पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. आता या मंचावर प्रेक्षकांना भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचं मराठमोळं रुप बघायला मिळणार आहे.