‘काय पो छे’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत Sushant Singh Rajput अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला. गेल्याच महिन्यात त्याचा ‘राबता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. क्रिती सनॉनसोबतच्या त्याच्या कथित प्रेमसंबंधांच्या चर्चा या चित्रपटादरम्यान होत्या. मात्र, या दोघांबद्दलच्या चर्चा आणि चित्रपटाची कथा यापैकी कोणतीच गोष्ट ‘राबता’ला तारू शकली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला. पण, त्याआधी आलेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मुळे सुशांतच्या चाहत्या वर्गात बरीच वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचे हे चाहते आता आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आगामी ‘चंदा मामा दूर के’ Chanda Mama Door Ke चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत.

‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात सुशांत दिसणार असल्याचे काही महिन्यांपूर्वीच सर्वांना कळले. पण, तुम्हाला माहितीये का, या चित्रपटाच्या तयारीसाठी सुशांत चक्क नासाला जाणार आहे. या चित्रपटात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर माधवन यांच्याही भूमिका आहेत. येत्या २१ ते २४ जुलैपर्यंत तब्बल चार दिवस सुशांत नासामध्ये ट्रेनिंग घेणार असल्याचं त्यानेच स्वतः सांगितलं.

वाचा : ‘वाईट अभिनेत्री बेड शेअर करायलाही तयार होतात’

यावर्षी सप्टेंबर महिन्यात ‘चंदा मामा दूर के’च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि इंटरनॅशनल स्टुडिओमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होईल. संजय पूरण सिंह चौहान चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून विकी रजानी याची निर्मिती करतील. काही दिवसांपूर्वीच सुशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलेला. यात तो मणिपूरमधील सीआरपीएफच्या जवानांसोबत दिसला होता.

https://www.instagram.com/p/BWKmaUdACOl/

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’साठी सिद्धूपाजींना मिळते एवढे मानधन

दरम्यान, सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे ही बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या पदार्पणाविषयी सुशांत म्हणाला की, ‘ती खूप प्रतिभावान आहे आणि एक चांगला चित्रपट तिला मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. ती चांगलं काम करेल असा मला विश्वास आहे.’