‘..डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’, हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली मालिका ‘चार दिवस सासूचे’. आपला संसार सुखी करण्यासाठी, सासरच्या अंगणात आयुष्यभर चंदनासारखी झिजणारी सून. सासरच्या अंगणात नांदायला आलेली ही सून कालांतरानी सासू होते. नवी सून घरात येते आणि एका ‘तिखट गोड’ नात्याची सुरुवात होते. थोडा संघर्ष, थोडी कुरबुर, थोडी माया असणारं एक नातं म्हणजे सासू-सुनेचं नातं.

आई आणि सासू या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू शकणार नाही. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे. आशालता देशमुख यांची देखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत. पण जेव्हा त्यांचा मुलगा घरात अनुराधाला सून म्हणून घेऊन येतो तेव्हा काय होतं? आशालता देशमुख यांचे मन ती कसं जिंकणार? अनुराधा घर कसं सांभाळेल हे एकंदरीत या मालिकेत पाहायला मिळतं. आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड – मेढेकर हिने साकारली आहे. ही मालिका ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
In the month of July, Sun, Venus, Mercury and mars transit subh yoga
जुलै महिन्यात सूर्य, शुक्र, बुध अन् मंगळ देणार बक्कळ पैसा! निर्माण होणार शुभ योग, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Suryakanta patil on track after joining sharad pawar ncp group All eyes on her Upcoming maharashtra assembly election performance
सूर्यकांता पाटील यांची गाडी अखेर रुळावर आली
After 365 days Sun will enter Leo sign People
३६५ दिवसांनंतर सूर्य करणार सिंह राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीचे लोक कमवणार पैसाच पैसा
Vat Purnima 2024
२१ की २२ जून, वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे? ३ मोठे राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या आर्थिक, वैवाहिक जीवनात येईल सुख
golden age of these zodiac signs
येत्या २ दिवसात सुरू होईल ‘या’ राशींचा सुवर्णकाळ, सूर्यासारखे उजळेल नशीब!
Retirement, Retirement life, Retirement old human life, Finding Purpose of living, routine life, Sisyphus Story, Sisyphus Story context of life, life philosophy, chaturang article,
सांधा बदलताना : सिसिफस
June Monthly Marathi Horoscope
शनी जूनचे ३० दिवस करणार १२ राशींवर राज्य; मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे भविष्य वाचा, तुमच्या नशिबात धन आहे की कष्ट?

आशालता देशमुख हे खूप मोठ प्रस्थ आहे. घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो आणि त्यांनी घेतलेला निर्णय कोणी बदलू शकत नाही. रवी म्हणजेच आशालता यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांच्या अपरोक्ष अनुराधाशी लग्न करतो आणि तिला सून म्हणून घरी आणतो. अनुराधा अत्यंत साधी, समंजस, स्वाभिमानी मुलगी. रवीने त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे ही गोष्ट अनुराधाला माहिती नाही. देशमुखांच्या घरात ती सून म्हणून येते आणि तिच्या खर्‍या प्रवासाला सुरूवात होते. “तुझं माझं” या वाटणीत भावनांचा – नात्यांचा कस पणाला लागतो आणि उरतो तो गृह कलह. अनुराधा घराला कशी सांभाळते, तिच्या वाटेवर आलेल्या संकटांना ती कशी खंबीरपणे सामोरी जाते ? या संघर्षात तिला रवीची साथ मिळते का याची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.