छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. देवोलीना डान्स आणि विविध व्हीडिओ शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करत असते. छोटी बहू फेम देवोलीनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक बेली डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

देवोलीनाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसतेय. देवोलीनाचा हा हॉट लूक पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत देवोलीना कॅप्शनमध्ये म्हणाली, “सराव..सराव आणि सराव.. या डान्सच्या प्रेमात आहे. अजून मी पूर्ण शिकले नाही.सध्या शिकत आहे हा डान्स त्यामुळे पूर्ण व्हिडीओ शेअर केला नाही. माझा कोर्स पूर्ण झाला की मी नक्की पूर्ण डान्स शेअर करेल. तोपर्यंत हे एन्जॉय करा.” असं देवोलिीना तिच्या कॅप्शनमध्ये म्हणालीय.काहींनी देवोलीनाचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांना मात्र देवोलीनाचा हा अंदाज बिलकुल आवडलेला नाही.

हे देखील वाचा: “मी या २-४ लोकांना का महत्व देऊ?”; शॉर्ट्समुळे ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांचं उत्तर

देवीलीनाच्या या व्हिडीओवर एक नेटकऱी कमेंट करत म्हणाला, “गोपी बहू हे काय?” तर दुसरा युजर म्हणाला, ” गोपी बहू संस्कार विसरलीस” तर आणखी एक युजर म्हणालाय, “हळू नाच नाहितर पुन्हा तुझी पाठदूखी सुरू होईल.”

devoleena-post
(photo-instagram@devoleena)

देवोलीना भट्टाचार्जी लोकप्रिय शो ‘साथ निभाना साथिया’ मधून होपी बहूच्या रुपात घराघरात पोहचली. या मालिकेमुळे देवोलीनाला मोठी लोकप्रियता मिळाली. तसचं ती ‘सवारे सबके सपने… प्रीतो’ या मालिकेतही झळकली होती.

Story img Loader