जगभरात नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळत असताना बॉलिवूडचे कलाकार तरी सेलिब्रेशनमध्ये कसे मागे राहतील? सोशल मीडियावरसुद्धा ख्रिसमसच्या शुभेच्छांचे पोस्ट आणि फोटोंचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडचा ‘सुलतान’ अर्थात सलमान खान, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, कंगना रणौत, दिया मिर्झा अशा अनेक कलाकारांनी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
ट्विंकलने अक्षयसोबत ख्रिसमस ट्रीसमोर डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचसोबत चाहत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर आलिया भट्ट, वरुण धवन, सलमान खान आणि कतरिना कैफ यांनीसुद्धा ख्रिसमस कॅप घातलेला फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सलमान आणि कतरिनासाठी यंदाचा नाताळ सण अधिक खास आहे, असे म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कतरिनासोबतचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तर आलियाने तिची जिवलग मैत्रीण कतरिनासोबतचा फोटो शेअर केला आहे. वरुण धवनने लहान मुलांसोबत अनोख्या पद्धतीने ख्रिसमस साजरा केला.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.