सीआयडी मालिकेला पसंत करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. एसीपी प्रद्युम्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होणार असल्याचे मालिकेत दाखविण्यात येणार आहे. साधारणपणे, दोन दशकांपेक्षा अधिक काळ चालणाऱ्या या मालिकेचा प्रेक्षकवर्ग उत्तरोत्तर वाढतच राहीला. पण, आता सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न या व्यक्तिरेखेचा मृत्यू होणार आहे. मालिकेत त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू होईल असे दाखविण्यात येणार आहे. असे म्हटले जाते की, एसीपी प्रद्युम्न यांचा हा भाग येत्या २६ डिसेंबरला प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

प्रदेश १८ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शिवाजी साटम आणि अन्य कलाकारांना मानधनात वाढ हवी होती. पण, वाहिनी आणि मालिकेच्या प्रॉडक्शन टीमला त्यांची मानधन वाढीची मागणी मान्य न केल्याचे कळते. यामुळेच या कार्यक्रमातून आता एसीपी प्रद्युम्न यांची व्यक्तिरेखा दिसणार नाही.

pune cp amitesh kumar marathi news
पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”
Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग
thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
shirur lok sabha latest marathi news
“अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’पणा ठासून भरला आहे म्हणूनच…”, शिवाजी आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर

मालिकाही होणार बंद
एसीपी प्रद्युम्न यांच्या मृत्युसोबतच सीआयडी ही मालिकाही बंद होणार असे म्हटले जात आहे. पण याबाबतीत प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

इतकी वर्षे एकच टीम कुठल्याही वादविवादात न पडता काटेकोरपणे काम करत असेल तर त्यांच्यात नक्कीच काही वेगळं रसायन असणार. शिवाजी साटम म्हणजे ‘सीआयडी’चे हुकमी शिलेदार. मालिका सुरू केली तेव्हा पुढची किमान दोन ते तीन वर्षे या मालिकेला कोणीच धक्का लावू शकणार नाही, याची आपल्याला खात्री होती. पण, कधी या तीन वर्षांचे गुणिले सहा झाले हे मात्र अजूनही आपल्याला कळलेलं नाही. असं ते काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते.