राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

TOP 10 NEWS वाचा : तीन वर्षीय मुलीला मदिरा देणाऱ्या अभिनेत्रीपासून ते मिलिंद सोमणच्या बर्थडेपर्यंत..

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खान व राम प्रसाद बिस्मिल या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते. तेथे तिची गाठ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या काही तरुणांशी पडते. या तरुणांना आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्धार सू मॅकिनली (अॅलिस) करते. पण, यादरम्यान चित्रपटात एक असे वळण येते ज्यामुळे या तरुणांचे संपूर्ण आयुष्यच बदलते. कॉलेजमधील या गँगमध्ये सोहा अली खानचाही समावेश असतो. यात तिच्या प्रियकराची भूमिका आर. माधवनने साकारली होती.

प्रश्न – आर. माधवनने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?
पर्याय
लेफ्टनंट अजय राव
लेफ्टनंट अजय राजगुरु
लेफ्टनंट अजय राठोड

वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी जवळपास सात वर्षे ‘रंग दे बसंती’च्या कथेवर काम केले होते. चित्रपटाला ५३व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यातील प्रश्नानेच उत्तर
संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट कोणता?
उत्तर – अगं बाई अरेच्चा