मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने नॉलेजच्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

वाचा : …अन् मिनाक्षी- अमृतामधील तो वाद आश्चर्यकारकरित्या मिटला

बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे ज्याच्या हाताला पाचऐवजी सहा बोटं आहेत. त्याच्या अंगठ्याच्या बाजुला हे सहावे बोट आहे. या अभिनेत्याला पहिल्याच चित्रपटाने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले होते. त्याचा स्वतःचा क्लोथिंग ब्रॅण्डही आहे.

प्रश्न – कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या हाताला सहा बोटं आहेत?
१. सैफ अली खान<br />२. वरुण धवन
३. हृतिक रोशन

अगदी लहान वयातच या अभिनेत्याने आपल्या वडिलांना कामात मदत करण्यासाठी सुरुवात केली होती. सेटवरील क्रूसाठी तो चहासुद्धा बनवून द्यायचा.

Year End 2017 Special वाचा : यंदाच्या वर्षी ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?
उत्तर – लॉर्ड माउंटबॅटन : द लास्ट व्हाइसरॉय