बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक, सिक्वलचे वारे जोरदार वाहत आहेत. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाचाही आता हिंदी रिमेक येणार आहे. आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हा चित्रपट घेऊन येतोय. पण तुम्हाला माहित आहे का? रिमेक, सिक्वल हे प्रकार काही आता आलेले नाहीत. तर अगदी ७०-८०च्या दशकातही रिमेक, सिक्वल ही संकल्पना होती.

वाचा : राणाचा ‘ही’च्यात जीव रंगला…

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released
Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

‘पिया का घर’ हा १९७२ साली आलेला चित्रपट एका हिट मराठी चित्रपटाचा रिमेक होता. यात जया बच्चन, अनिल धवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. भारतातील सर्वात मोठे शहर असलेल्या मुंबईत जगणे किती कठीण असते याची विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडणी करण्यात आलेली. बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर’ चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रोडक्शन्सने केलेली. ज्या मराठी चित्रपटावरून हा रिमेक आलेला त्याचे दिग्दर्शन राजा ठाकूर यांनी केलेले. तो चित्रपट कोणता हेच तुम्हाला ओळखायचे आहे.

प्रश्न – ‘पिया का घर’ कोणत्या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे?
पर्याय
१. पिंजरा
२. साधी माणसं
३. मुंबईचा जावई

वाचा : मी गणपतीची पूजा करणारच, ट्रोल करणाऱ्यांना साहिल खानने सुनावलं

चित्रपटातील ‘बम्बई शहर की’, ‘पिया का घर’, ‘ये जीवन है..’ या गाण्यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. तर लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात ही गाणी गायली होती.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर – मिर्झा गालिब