‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि कतरिना दोघे ही रशियाला रवाना झाले आहेत. यावेळी सलमानचा विमानतळावरील व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. त्यासोबतच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने सलमानला ओळख निश्चितीसाठी अडवल्याने हा जवानदेखील चर्चेत आला होता. लोकांनी जवानाची स्तुती केली असली तरी या जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. जवान सोमनाथ मोहंतीवर प्रोटोकॉल उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सोमनाथ यांनी मीडियाशी बातचित केल्याने काही अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल जप्त केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र प्रत्यक्षात जवानावर अशी कोणतीही कारवाई न झाल्याचं आता सीआईएसएफ (CISF) कडून स्पष्ट करण्यात आलंय. सीआईएसएफ जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याची एक बातमी रीट्वीट करण्यात आलीय. यात सीआईएसएफने म्हटलंय, ” या वृत्तात काहीही तथ्य नाही. खरं तर, या प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्याचे पालन करताना प्रोफेशनल वागल्याबद्दल योग्य ते बक्षीस देण्यात आलंय.” सीआईएसएफच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आलेलं हे ट्वीट आता सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा: “रणवीर सिंह बाबा झाला”; चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती च्रोपाने दिलं ‘हे’ उत्तर

हे देखील वाचा: ऐकावं ते नवलच: कर्नाटकात अमिताभ बच्चन यांची लक्झरी कार जप्त, सलमान खान चालवत होता गाडी

नुकताच सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात सलमान खान एका आलिशान गाडीतून उतरताना दिसत आहे. एअरपोर्टवर एण्ट्री घेत असताना सलमानला एका सीआईएसएफने जवानाने ओळख पटवण्यासाठी अडवल्याचं दिसतंय. त्यानंतर सलमानने देखली लगेच मास्क काढत सर्व प्रक्रिया पूर्ण केलीय. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सलमान खानसोबतच कर्तव्य पार पाडणाऱ्या जवानाचं देखील कौतुक केलं.