सोनी टीव्हीवर कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये सध्या कोणाचा शो उत्तम ठरेल यावरून शीतयुद्ध सुरू असताना दिसत आहे. कपिलने आपला शो वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. पहिल्यांदा कपिलकडून कृष्णाचे मानधन कमी करण्याच्या बातम्या समोर आला होता. हे कमी की काय आता कृष्णाची अनेक वर्षांपासूनची सहकारी भारती सिंगही आता कपिलच्या चमूत सहभागी झाली आहे.

अन् पंडित अभिषेकी एकाएकी गायब झाले- अशोक पत्की

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त भारतीच नाही तर तिचा होणारा पती हर्ष लिंबाचिया हे दोघंही लवकरच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहेत. हर्ष कॉमेडी शोचा लेखक आहे. याआधी त्याने ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोसाठी लेखक म्हणून काम केले होते. कपिलचा जुना मित्र चंदन प्रभाकर नुकताच शोमध्ये परतला आहे. त्यामुळे आता भारतीच्या येण्याने त्याची ताकद नक्कीच दुप्पट झाली असेल यात काही शंका नाही.

जेव्हा कपिलने कलर्स वाहिनीसोबत आपले नाते तोडले होते, तेव्हा भारती आणि कृष्णाने कलर्ससोबत ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’ या नवीन शोची सुरुवात केली होती. आता भारती आणि कपिलची ही विनोदाची भट्टी किती पेटते आणि त्याचा दाह कृष्णाला लागतो का हे येत्या काळात कळेलच.

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’च्या मृत्यूने पांजरपोळ संस्था शोकाकूळ

दरम्यान, भारतीला काही दिवसांपूर्वी पोटात दुखण्याच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ जूनला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिला रात्री ३ वाजता भरती करण्यात आले होते. तिला मुतखडा झाल्याचे निदान डॉक्टरांनी दिलेले. तिच्यावर काही दिवसांपूर्वी सर्जरीही करण्यात आली होती. भारतीने तिचा रुग्णालयातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तब्येत बरी असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. नुकताच तिला डिस्चार्जही देण्यात आला आहे.