आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंगच्या आयुष्यात एक नवे वळण आले आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची लग्नगाठ बांधली गेली. चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यात बऱ्याच टेलिव्हिजन सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सोशल मीडियावरही #bhartikibaraat या हॅशटॅगसह अनेकांनीच भारती आणि हर्षच्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले. लग्नसोहळ्यानंतरही भारतीचे पोस्ट वेडिंग फोटो अनेकांचे लक्ष वेधत आहेत.

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळते. तीच उत्सुकता लक्षात घेत खुद्द भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. लग्नसोहळा आटोपल्यानंतर या नवविवाहित दाम्पत्याने गोव्यातील काही निसर्गरम्य ठिकाणी खास क्षण व्यतीत केले. आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासाला सुरुवात झाली आहे, असे कॅप्शन देत भारतीने हर्षसोबतचा एक फोटो पोस्ट केला. तर, हर्षनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीसोबतचा फोटो पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्यात काही खास क्षण व्यतीत केल्यानंतर ही जोडी मुंबईतही परतली. तेव्हा आता काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा कार्यक्रम आणि ठरलेल्या वेळापत्रकाकडे वळतील असे म्हटले जात आहे. एका रिअॅलिटी शोच्या सेटवर भारती आणि हर्षची भेट झाली होती. ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट ‘वगैरे ज्या काही संकल्पना आहेत, तसे त्यांच्यात काहीच झाले नाही. पण, कलाकारांच्या प्रेमकहाणीत असणारी मजेशीर वळणं मात्र त्यांच्या प्रेमकहाणीला आणखीनच खास टच देऊन गेली. त्यांचे हे नाते नेमके कसे खुलत गेले त्याचा प्रवास त्यांनी एका वेब शोच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणला आहे. ‘ऑनबोर्ड लाइव्ह’ या युट्यूब चॅनलवर #BhartiKiBaraat या नावाने वेब शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे.