२१ दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या २१ दिवसात घरी असतो तर काय केलं असतं तुम्हाला पहायचंय का?, असं म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार फिदा झाले आहेत. अनेकांनी ट्विट करुन मुंबई पोलिसच खरे सुपर हिरो असल्याचं सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये? या व्हिडिओमध्ये काही महिला पोलीसांबरोबर पोलीस अधिकारीही ‘मी २१ दिवस घरी असतो तर काय केलं असतं?’ या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहेत. ‘आम्ही घरातून बाहेरच येणार नाही’ असं मास्क लावलेली व्हिडिओतील पहिलीच महिला पोलीस हवालदार सांगताना दिसते. “पोलिसांना कुटुंबाला वेळ देत येत नाही. त्यामुळे अशी संधी मिळालीच तर आम्ही नक्कीच कुटुंबाला वेळ देऊ,” असं त्या सांगतात. तर एक पोलीस अधिकाऱ्याने “मला अशी संधी मिळाली असती तर मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवला असता,” अशी इच्छा व्यक्त केली. “जर मी घरी असते तर मी घरच्यांसोबत म्हणजेच माझी आईबरोबर, बहिणींबरोबर वेळ घालवला असता. पुस्तकं वाचली असती. चित्रपट पाहिले असते,” असं एक महिला पोलीस हसत हसत सांगताना दिसते. “घरी असतो तर मी पुस्तकं वाचली असती, मुलांबरोबर खेळतो असतो,” असं मास्क लावलेला एक पोलीस हवालदार व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. तर एक महिला पोलीस अधिकारी विवाहित असल्याने मी नवऱ्याला वेळ दिला असता असं सांगते. “माझं लग्न झालं आहे. मात्र मला माझ्या नवऱ्याला वेळ देता येत नाही. आता इथे २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे २१ दिवस मिळाले असते तर मी माझ्या नवऱ्याला वेळ दिला असता. घरात वेळ घालवला असता,” असं ही महिला सांगते. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने “मला सुट्टी असती तर मी माझ्या पत्नीबरोबर, घरातील पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवला असता. खूप झोपा काढल्या असत्या”, असं सांगितलं. “मी घरच्यांबरोबर वेळ घालवला असता, जेवण बनवलं असतं, झोपले असते, चित्रपट पाहिले असते, मस्त वेळ एन्जॉय केला असता,” असं महिला हसत हसत सांगताना दिसत आहे. Feel that the lockdown is just too long? Guess what we would’ve done had we been home?#MumbaiFirst#TakingOnCorona pic.twitter.com/Ec80R6Cm1U — Mumbai Police (@MumbaiPolice) April 8, 2020 या व्हिडिओच्या ट्विटला रिट्विट करत अनेक कलाकारांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू, तुमच्याबद्दलचा आदर शब्दात व्यक्त करता येणार नाही, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया कलाकारांनी नोंदवल्या आहेत. कोण काय म्हणालं आहे पाहुयात. व्हिडिओ शेअर करणाऱ्या अजय देवगणला मुंबई पोलिसांचा रिप्लाय Dear ‘Singham’, Just doing what ‘Khakee’ is supposed to do to ensure that things return to how they were - ‘Once upon a time in Mumbai’! #TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 8, 2020 यावर अजय म्हणाला, तुम्ही फक्त आवाज द्या हा सिंघम. Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice — Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020 मराठमोळी सई ताम्हणकर म्हणाली मुंबई पोलीस जगात भारी जगात भारी @MumbaiPolice. Gratitude !!!! — Sai (@SaieTamhankar) April 9, 2020 पोलीस म्हणतात भारी तर आहोतच पण. भारी तर मुंबईकर आहेत, आम्ही फक्त मुंबईला पुन्हा एकदा 'झकास' बनवण्याचं 'मिशन पॉसिबल' करण्याचा प्रयत्न करतोय. — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्क्विन्हा म्हणतो, आपण किती गोष्टी गृहित धरतो So touching!! We take for granted the simple things in life. Thank you @MumbaiPolice for keeping our city safe and for all the family sacrifices you make — Viren Rasquinha (@virenrasquinha) April 8, 2020 मुंबई पोलिसांचे उत्तर, "आम्हाला आवडणाऱ्या शहराची सेवा करायला मिळतेय हाच आमचा सन्मान" Your words inspire us to rise and do our best, Captain! We’re honoured to serve the city that we love the most. #TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 8, 2020 सुनील शेट्टी म्हणाला हेच खरे हिरो. त्यावर मुंबई पोलीस म्हणतात. And every ‘Dhadkan’ of our beats for this city. :) — Mumbai Police (@MumbaiPolice) April 8, 2020 सदैव तुमच्या ऋणात राहू असं अभिषेक बच्चन म्हणाला Always in debt to them and the great work they do. @MumbaiPolice — Abhishek Bachchan (@juniorbachchan) April 9, 2020 मुंबई पोलिसांचा अभिषेक बच्चनला भन्नाट रिप्लाय, "होय सगळं नॉर्मल होईल फक्त मुंबईकरांनी दस बहाणे करता कामा नये" Just taking the ‘ACP Jai Dixit’ route to ensure that the city gets back to normalcy soon - that too, with a ‘Dhoom’! All Mumbaikars need to do is not make ‘Dus Bahaane’ about going out unnecessarily! — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धन्यवाद असं रिचा चढ्ढा म्हणाली This is a very sweet video! Thank you @MumbaiPolice for keeping us safe ! — TheRichaChadha (@RichaChadha) April 9, 2020 तुमचे धन्यवाद करावे तितके कमीच आहेत असं अजूर्न कपूर म्हणतोय.. We cannot thank the @MumbaiPolice enough in words! Still would like to appreciate the fact that they have been out there everyday, making sure everything goes smoothly and have always been there to protect us. A thank you from the bottom of our hearts! Stay safe. Jai Hind. — arjunk26 (@arjunk26) April 9, 2020 अर्जूनला मुंबई पोलिस म्हणतात शहरावर प्रेम करणारे हजारो इश्कजादे आहेत. Taking no ‘half’ measures to ensure safety from #corona in Mumbai - a city with millions of ‘Ishaqzaades’ in love with it! — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 “तुमच्या बद्दलचं प्रेम आणि आदर आम्ही शब्दात मांडू शकत नाही,” असं आलिया भट्टने म्हटलं आहे. Thank you @MumbaiPolice Words cannot express our love and gratitude. Let's stay home for them. #TakingOnCorona — Alia Bhatt (@aliaa08) April 9, 2020 आलियाला मुंबई पोलिसांचे उत्तर. Mumbaikars, we hope you all are 'Raazi' with this advise of Ms @aliaa08 to not venture out in any ‘Gully’ unnecessarily and take care of ‘Dear Zindagi’ for all! — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 रविना तंडन म्हणते मुंबई पोलिसांना धन्यवाद म्हणण्याची हीच ती वेळ This is the time to thank our mumbai police,who leave their families at home and are working with untiring efforts for our security and safety.. Thank you @MumbaiPolice we are forever indebted — Raveena Tandon (@TandonRaveena) April 9, 2020 आपल्या स्वप्नांसाठी स्वत:ची स्वप्न पणाला लावणारे मुंबई पोलीस असं शाहीद कपूरने मुंबई पोलिसांचं वर्णन केलं आहे. Giving up on their dreams for keeping the city of our dreams safe. Thank You @MumbaiPolice We owe you a lot and staying at home is the least we can do! #TakingOnCorona #MumbaiFirst — Shahid Kapoor (@shahidkapoor) April 9, 2020 शाहीदच्या ट्विटवर पोलीस म्हणतात, "सर्वात शानदार पाठिंबा दाखवायचं असेल तर." The most ‘Shaandaar’ support Mumbaikars can provide right now is to stay at home. And make plans for what all we would do together ‘Jab We Meet’ post #lockdown #TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 क्रिकेटपटू धवल कुलकर्णी म्हणतो, "आम्ही तुम्हाला खूप काही देणं लागतो" Sacrificing their dreams for keeping the city of our dreams safe. Thank You @MumbaiPolice @DGPMaharashtra We owe you a lot !! Staying at home is the least we can do. #TakingOnCorona #WarAgainstVirus — Dhawal Kulkarni (@dhawal_kulkarni) April 9, 2020 आम्ही नशिबवान आहोत की तुम्ही आहात, असं टायगर श्रॉफ म्हणतोय. So so grateful and lucky we are to have you all @MumbaiPolice can’t thank our real heroes enough — Tiger Shroff (@iTIGERSHROFF) April 9, 2020 तर बॉलिवूडचे भिडू आणि टायगरचे वडील जॅकी श्रॉफ म्हणतात, "मुंबई पोलीसच खरे स्टार" @MumbaiPolice @DGPMaharashtra Asli Stars#RealHeroes #OurPride pic.twitter.com/WEE9x0nCcc — Jackie Shroff (@bindasbhidu) April 9, 2020 आयुष्मान खुरानाचे मराठीत ट्विट. Tumhala dhanyavad denyasathi mi nishabd jhalo ahe, parantu mi aaj tumhala hrudayapasun dhanyavad det aahe. Jai Hind! @MumbaiPolice @DGPMaharashtra #ThankYouMumbaiPolice #ThankYouMaharashtraPolice — Ayushmann Khurrana (@ayushmannk) April 9, 2020 आणि पोलिसांनीही मानले आयुष्मानचे आभार. धन्यवाद, 'विकी'! आम्ही मुंबईकरांना 'ज़्यादा सावधान' ठेवण्यासाठी सर्व काही करू. #TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020 भारी व्हिडिओ आहे नक्की पाहा असं चेतन भगत म्हणतोय Fantastic video. Do watch. And thank you @MumbaiPolice ! — Chetan Bhagat (@chetan_bhagat) April 8, 2020 शेवटचं आवाहन अत्यंत महत्वाचं व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी एक आवाहन केलं आहे. “खूप साध्या इच्छा आहेत नाही यांच्या. मात्र मुंबई सारख्या स्वप्न नगरीची कोणतीही स्वप्न अपूर्ण राहू नयेत म्हणून त्यांना या इच्छा पूर्ण करता येत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता यावी म्हणून ते बाहेर आहेत. त्यामुळेच त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करणार नाही का? त्यांची सर्वात मोठी इच्छा हीच आहे की मुंबई आणि मुंबईकरांनी करोना आणि त्यासारख्या इतर सर्व धोक्यांपासून सुरक्षित रहावं. कराल ना त्यांना मदत?” असा सवाल पोलिसांनी मुंबईकरांना विचारला आहे.