करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८० च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले होते. त्यात भर म्हणून आता डीडी वाहिनीने हनुमान उडी घेतली आहे. ८० आणि ९० च्या दशकातील रामायण, ब्योमकेश बक्षी आणि शक्तीमान या मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू झाल्याने डीडी वाहिनी सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनी ठरली आहे.

Coronavirus Lockdown : रामायण मालिकेने केला धडाकेबाज विक्रम

२८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी नॅशनल वाहिनीने दमदार पराक्रम करून दाखवला आहे. २१ ते २७ मार्च या काळात हिंदी मनोरंजनाच्या वाहिन्यांमध्ये डीडी पहिल्या १० मध्ये देखील नव्हते, पण २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सारे विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले आहे. Broadcast Audience Research Council-Nielsen ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीनुसार डीडी नॅशनल वाहिनीचा प्रेक्षकवर्ग १३ व्या आठवड्यात (२८ मार्च ते ३ एप्रिल) सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत ५८० मिलियन एवढा झाला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रेक्षकवर्ग केवळ १ मिलियन इतकाच होता. याशिवाय १३ व्या आठवड्यातील करस्पॉडिंग प्रेक्षकवर्गदेखील ८३५ मिलियन एवढा दिसून आला. १२ व्या आठवड्यात तो केवळ २ मिलियन इतकाच होता.

लॉकडाउनला कंटाळून शारापोवाने थेट फोन नंबरच केला शेअर

डीडी नॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी शेखर यांनी या संबंधीची माहिती दिली. BARC इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार १३ व्या आठवड्यात डीडी नॅशनल ही सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनी ठरली आहे. सर्व प्रेक्षकवर्गाचे मनापासून धन्यवाद. करोनाच्या तडाख्यात सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, असे ट्विट करत शशी शेखर यांनी माहिती दिली.

याशिवाय, महाभारत मालिकेच्या पुन:प्रक्षेपणामुळे डीडी भारती वाहिनीचा प्रेक्षकवर्ग ३६५ पटीने वाढून १४५.८ मिलियन इतका दिसून आला. तसेच डीडी च्या सर्व यु-ट्यूब चॅनेलवरील डीजिटल ट्रॅफिकदेखील दुप्पट झाले आहे.