मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके कपल म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. नुकताच सुव्रतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच दोघांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच दोघांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. मात्र, सुरुवातीला याची माहिती इतरांना दिली नसल्याचं देखील त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा : जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘द फॅमिली मॅन २’?

‘१२ एप्रिल, आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी मला आणि सखीला हे गिफ्ट मिळाले. आमच्या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सुरुवातीला आम्ही कोणालाच सांगितले नाही कारण सर्वांना चिंता वाटेल. आम्ही योग्य ती काळजी घेतली. आता मी हळूहळू थोडा व्यायाम सुरु केला आहे. दोन आठवड्यानंतर आम्ही प्लाजमा डोनेट करण्यासाठी जाणार आहोत’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

आणखी वाचा : अभिनेत्री उपासना सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल

पुढे तो म्हणाला, ‘करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी परेदाशात एका चित्रपटाचे, दोन वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले. आम्ही अमर फोटो स्टुडीओ नाटकाचे प्रयोग देखील पुन्हा सुरु केले होते. त्यावेळी मी अनेकांच्या संपर्कात आलो होतो त्यामुळे मला करोना होऊन गेला असे वाटत होते. पण असं नाही. करोनाची लक्षणे फार वेगळी आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्षांपूर्वी सखी आणि सुव्रतने लग्न केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी लग्न केले.