दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपण अनेक अभिनेत्यांना लुंगी घातल्याचे पाहिले आहे. सुपरस्टार रजनीकांतपासून ते दलकर सलमान, धनुष, नाग चैतन्य, अजित कुमार, अल्लू अर्जून आणि आता राणा डग्गुबतीपर्यंत सर्वंच अभिनेते लुंगीवर एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडताना दिसतात. टॉलिवूडसोबतच बॉलिवूडलाही लुंगीची तेवढीच क्रेझ असल्याची आपल्याला पाहायला मिळते.
‘बाहुबली’मध्ये धिप्पाड देहयष्टीचा विलनची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता राणा डग्गुबती आगामी तेलगू चित्रपट ‘नेने राजू नेने मंत्री’मध्ये लुंगीमध्ये एका नव्या रूपात आपल्याला दिसणार आहे.
आपल्या स्टाईल आणि कमालीच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांतचा १६४ वा चित्रपट ‘काला’चा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला होता. वयाच्या ६६ व्या वर्षीही रजनीकांत या पोस्टरमध्ये लुंगीवर आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
वाचा : VIDEO : राज कपूर आणि वहिदा रेहमानचा ‘शेप ऑफ यू’
केवळ रजनीकांतच नाही तर त्यांचा जावई धनुषसुद्धा अनेक चित्रपटांमध्ये लुंगीवर आपल्याला पाहायला मिळतो. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुनचा मुलगा नाग चैतन्य ‘प्रेमम’ या चित्रपटात वाढवलेली दाढी आणि पांढऱ्या लुंगीच्या लूकमध्ये तरुणींना आणखीनच वेड लावताना दिसत आहे.
वाचा : अखेर प्रभासचं सर्वात मोठं गुपित उघड झालं
शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘लुंगी डान्स.. लुंगी डान्स’. रॅपर हनी सिंगने गायलेल्या या गाण्याने आजवर अनेकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं. या धमाल गाण्यापासूनच ‘लुंगी डान्स’ हा एक आगळावेगळा डान्स फॉर्मसुद्धा नावारुपास आला.
टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत या लुंगीचा असा प्रवास अत्यंत रंजक असा आहे. या लुंगीची क्रेझ यापुढेसुद्धा अनेक अभिनेत्यांमध्ये कायम राहील यात शंकाच नाही