सलमान खानच्या रेस- ३ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणे हा सिनेमाही चटपटीत मसालापट म्हणून प्रदर्शित करण्यात येणार आहे. रेस- ३ चा ट्रेलर सध्या नेटकरांच्या रडारवर आहे असेच म्हणावे लागेल. इतका हास्यास्पद ट्रेलर आजपर्यंत पाहिला नाही अशापद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया सिनेमाच्या ट्रेलरला येत आहेत. या सिनेमाचे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यूट्युबवर गेल्या काही दिवसांपासून रेस- ३ चा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. एकीकडे सलमाचे चाहते या सिनेमाकडे फास्ट अॅण्ड फ्युरियसचा देसी अवतार म्हणून पाहत आहेत. तर काहींनी हा ट्रेलर पाहण्याची तसदीही घेतली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे सिनेमात सबकुछ सलमान दाखवणं आणि या वयातही आशयघन सिनेमे न करता संहिता नसलेल्या सिनेमांत काम करणं.

सिनेमात पांढऱ्या दाढीतला अनिल कपूर असो किंवा हातात रॉकेट लॉन्चर घेऊ उभा असलेला सलमान खान असो. नेटकऱ्यांनी या सगळ्याच गोष्टींची पुरेपुर टेर उडवली आहे.

वाचा : ‘एक बार फिर अदालत होगी..’, ‘मुल्क’चा फर्स्ट लूक प्रदर्शित 

सध्या अभिनेत्री डेझी शहाच्या तोंडी असलेल्या माय बिझनेस इज माय बिझनेस इट्स नन ऑफ युवर बिझनेस या संवादाची टेर उडवली जात आहे. हा संवाद ऐकल्यानंतर अनेक लोकांनी याचा संबंध दैनंदिन आयुष्याशी लावला आहे. सध्या याचे मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

https://twitter.com/Anant52251293/status/996697846693838848

आपल्या संवादाचं अशाप्रकारे विडंबन होईल अशा स्वतः डेजीलाही कल्पना नसेल. पण म्हणतात ना चांगली किंवा वाईट प्रसिद्धी मिळणं महत्त्वाचं असतं. सलमान खानच्या रेस-३ टीमच्या बाबतीतही काहीसं असंच झालं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.