अभिनयासोबतच नृत्यातही आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणजेच अमृता खानविलकर. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅम दीवा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षी पती हिमांशू मल्होत्रासोबत ‘नच बलिये ७’ चा किताब पटकावला होता. अवघ्या महाराष्ट्राला ‘वाजले की बारा’ म्हणत नाचवणारी ही अभिनेत्री आता ‘डान्स इंडिया डान्स ६’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

वाचा : तीन वेळा लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याच्या घरी तान्हुल्याचे आगमन

अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या अमृताच्या मनावरही एक अभिनेता राज्य करतो. याचा खुलासा खुद्द अमृतानेच एका मुलाखती दरम्यान केला. तुझा आवडता डान्सर कोण? असा सवाल केला असता अमृता पटकन म्हणाली की, रणवीर सिंगवर माझे क्रश आहे. त्याचे नृत्य कौशल्य मला फार आवडते. त्याला नाचताना बघितल्यावर माझ्या तोंडातून एकच शब्द येतो तो म्हणजे, वॉव! माझ्यासाठी केवळ रणवीर सिंग हा एकमेव अभिनेता आहे.

‘डान्स इंडिया डान्स ६’ विषयी अमृता म्हणाली की, मला या शोचे सूत्रसंचालन करण्याची ऑफर आली तेव्हा ती स्वीकारावी की नाही याबाबत मी साशंक होते. पण, शोमध्ये मला डान्स करण्याचीही संधी मिळणार असल्याचे कळताच मी पुढच्याच क्षणाला त्यासाठी होकार दिला. माझ्यासोबत सूत्रसंचालन करणारा साहिल हा पंजाबी आहे. त्यामुळे पंजाबसोबतच शोला महाराष्ट्रीय टच मिळावा, अशी निर्मात्यांची इच्छा होती.

वाचा : बिग बी तिला भेटायला पोहोचले अन्..

जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या ग्रॅण्ड सोहळ्यात नुकतीच ‘डान्स इंडिया डान्स’च्या सहाव्या सीजनची घोषणा करण्यात आली.

https://www.instagram.com/p/Ba-qJ5TjQ7Y/

Story img Loader