छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपून जवळपास दोन वर्षे उलटली असून मालिकेतील पात्रे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या तिघांनी त्यांच्या आगामी मालिकेच्या निर्मात्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

२०१८मध्ये CID मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याच मालिकेवर आधारित नवी मालिका आणण्याचा विचार निर्मात्यांनी केला. या मालिकेचे नाव CIF असे ठेवण्यात आले असून २०१९ मध्ये मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. या मालिकेत दयानंद शेट्टी (दया), आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) आणि दिनेश फडणीस (फ्रेडी) एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची उत्सुकता वाढली होती.

पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार सहा ते सात महिने अभिनेत्यांनी काम करुनही त्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत. शेवटी दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, दिनेश फडणीस यांनी CINTAA (Cine And TV Artistes’ Association)कडे मालिकेच्या निर्मात्या विरोधात तक्रार केली आहे.

CID ही मालिका १९९८ साली सुरु झाली होती. या मालिकेने जवळपास १५४७ एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले. पण आता या कलाकारांची फसवणूक झाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.

Story img Loader