गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘डिअर जिंदगी’च्या नावाखाली सुरु असलेल्या चर्चा आणि या चित्रपटाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा प्रिमिअर नुकताच पार पडला. बऱ्याच सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘डिअर जिंदगी’च्या या खास प्रदर्शनानंतर लगेचच ट्विटरवर या कलाकारांनी चित्रपटाबद्दल व्यक्त व्हायला सुरुवात केली. सेलिब्रिटींनी भरभरुन कौतुक केल्यानंतर तरी असेच वाटत आहे की, सेलिब्रिटींनाही ‘डिअर जिंदगी’ची भुरळ पडली आहे.
वाचा: .. म्हणून गर्दीतही स्वत:ला एकटा समजतो किंग खान
आलियाने साकारलेल्या ‘कायरा’च्या ब्रेकअपनंतर तिच्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वळणांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. कुणाल कपूर, अंगद बेदी आणि अली जफर यांच्या येण्याने ‘कायरा’च्या जीवनात उद्भवलेले पेचप्रसंग या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. अभिनेता शाहरुख खानही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. बिकट प्रसंगांमधून सावरण्यासाठी शाहरुख या चित्रपटामध्ये आलियाची म्हणजेच कायराची मदत करताना दिसत आहे. असे वेगळ्या धाटणीचे कथानक हाताळणाऱ्या या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगनंतर विविध कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने ट्विट करत ‘काल रात्री #DearZindagi पाहून खूपच आनंद झाला. मी अजूनही त्याचाच विचार करत आहे’, असे लिहिले. तर अभिनेत्री सोफी चौधरीनेही या चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेची स्तुती करणारे एक ट्विट केले. एकीकडे शाहरुखची स्तुती होत असताना दिग्दर्शक होमी अदजानीया यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाचे फार कौतुक केले. त्यांनी केलेल्या ट्विटमधून या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही कौतुक केले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकरनेसुद्धा आलिया भट्टच्या भूमिकेबद्दल तिला शाबासकी दिली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडकरांचा उत्साह पाहता या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवरही कायम राहणार का? हे अवघ्या काही तासातच उघड होईल.
#DearZindagi असा हॅशटॅग लावत सेलिब्रिटींनी केलेले काही ट्विट्स…
https://twitter.com/itsSSR/status/801656769525125121
https://twitter.com/ShashankKhaitan/status/801522630587101184
Said it before but again I’m genuinely staggered at the nuance and depth @aliaa08 brings to each performance. Supreme.