दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आपल्या कामात ती कितीही व्यस्त असली तरी स्वतःसाठी वेळ काढायला ती विसरत नाही. शॉपिंगला जाणं, चांगल्या ठिकाणी जेवायला जाणं यातून ती स्वतःला वेळ देते. तिची नवीन जाहिरात पाहून हे तर अजूनच स्पष्ट होतं. या जाहिरातीत दिसणाऱ्या तिच्या मोहक हास्यावरून नजरच हटत नाही. या जाहिरातीची प्रत्येक फ्रेम तिचं सौंदर्य अधिकच खुलवते. कमीत कमी मेकअपमध्ये खुलणारं तिचं सौंदर्य अजूनच लक्ष वेधून घेतं.

राजकारणामुळे फवाद खानचा बळी गेला- रणबीर कपूर

जवळपास १८ प्रॉडक्टची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणाऱ्या दीपिकाने नुकतेच अॅक्सिस बँकेसाठी एका जाहिरातीचं चित्रीकरण केलं. न्यू-यॉर्कमधील नावाजलेले दिग्दर्शक आणि छायाचित्रकार डीन फ्रीमॅन यांनी या जाहिरातीचे चित्रीकरण केले आहे.

बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडच्या मस्तानीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. सौंदर्य प्रसाधनांपासून एअर लाइन्सपर्यंत आणि मोबाइल फोनपर्यंत सर्वच मोठ्या कंपन्यांची दीपिका ब्रॅण्ड अँम्बेसिडर आहे. आपल्या हरहुन्नरी अभिनयाने तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडकरांची मनं तर जिंकलीच आहेत. शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही तिने अधिराज्य गाजवलं आहे.

काही महिन्यांपूर्वी तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याशिवाय ‘फोर्ब्स’च्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिच्या नावाचा समावेश होता. ३१ वर्षीय दीपिका ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमानंतर लवकरच ‘पद्मावती’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा अजून एक हॉलिवूडपट येणार असल्याची चर्चाही सिनेवर्तुळात रंगत आहे.

Priyanka Chopra: बॉलिवूडच्या देसी गर्लचा आजवरचा प्रवास